आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक मतदारसंघासाठी अाता किशाेर दराडेंची मोर्चेबांधणी; २५ जूनला निवडणूक, २८ ला निकाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघासाठी २५ जून रोजी मतदान होणार असून, २८ जून रोजी मतमोजणी होणार आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत गुरुवारी नरेंद्र दराडे यांनी विजय साकारताच त्यांचे बंधू किशाेर दराडे हे नाशिक शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढविण्यासाठी सरसावल्याची जोरदार चर्चा राजकीय गोटात सुरु झाली असून, त्यादृष्टीने   हालचालीही सुरू झाल्या आहेत. दरम्यान, इतर सात उमेदवारांनी आधीच दावेदारी केली असून, आता दराडे निवडणुकीत उतरले तर आतापर्यंतच्या सर्वच समीकरणांची उलटफेर होणार आहे. 


गुरुवारपासून आचारसंहिता जारी झाल्याने जाहीर प्रचाराला मर्यादा येणार आहेत. 
उपायुक्त रघुनाथ गावडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत निवडणूक कार्यक्रमाबाबत माहिती दिली. केंद्रीय निवडणूक आयोगाने उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत शिक्षक मतदारसंघ आणि पदवीधर मतदारसंघासाठी ८ जून रोजी मतदान ठेवले होते. मात्र, शाळांना सुट्ट्या असल्याने मतदानावर परिणाम होण्याची दाट शक्यता असल्याने इच्छुकांनी याविरोधात आयोगाकडे मतदान शाळा सुरू झाल्यावर घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने ८ जून रोजी होणाऱ्या मतदानाची तारीख आता २५ जून केली आहे. 


राज्यातील चार शिक्षक मतदारसंघातील आमदारांची मुदत ७ जुलै रोजी संपणार आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघातील डाॅ. अपूर्व हिरे, मुंबई मतदारसंघाचे कपिल पाटील, मुंबई पदवीधरचे डाॅ. दीपक सावंत, कोकण विभाग पदवीधर शिक्षकचे निरंजन डावखरे यांची मुदत ७ जुलै रोजी संपत आहे. सध्या उन्हाळी सुट्ट्या असल्याने शिक्षक मतदार हे आपापल्या घरी गेले असल्याने उमेदवारांना शिक्षकांचे घर शोधणे अवघड होऊन बसले आहे. शाळा १५ जून रोजी सुुरू होणार असून निवडणूक २५ जून रोजी आहे.

 

त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढणार असल्याने उमेदवारांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. नाशिक विभागात एकूण ५२ संस्थाचालकाला हा ही निवडणुकीतील महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. विभागीय महसूल आयुक्त राजाराम माने निवडणूक निर्णय अधिकारी तर उपायुक्त रघुनाथ गावडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी असतील. तसेच प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सहायक निवडणूक अधिकारी राहतील. 

 

निवडणूक प्रक्रिया अशी 
३१ मे : निवडणूक अधिसूचना 
७ जून : नामनिर्देशन दाखल करण्याची अंतिम मुदत 
८ जून : अर्जाची छाननी 
११ जून : अंतिम माघारी 
२५ जून : मतदान सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत 
२८ जून : मतमोजणी 

बातम्या आणखी आहेत...