आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोपर्डी : तिन्ही अाराेपींकडून फाशीच्या शिक्षेस अाव्हान देण्यास विलंब

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- राज्यभर गाजलेल्या नगर जिल्ह्यातील कोपर्डीतील अत्याचार व हत्याकांड प्रकरणास १३ जुलै राेजी दोन वर्षे पूर्ण झाली. या प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावलेले तीनही आरोपी गेल्या २४ महिन्यांपासून येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहेत. अहमदनगर सत्र न्यायालयाने त्यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेस अाव्हान देण्याची मुदत उलटून गेली अाहे. यापैकी एका आरोपीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात विलंबाबद्दलचा माफीचा अर्ज दाखल केला आहे. यावर येत्या १६ ऑगस्ट रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. कोपर्डीच्या सुद्रिक वस्तीवर, या प्रकरणातील बळी ठरलेल्या पीडितेला शुक्रवारी श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. 


१३ जुलै २०१६ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या अत्याचाराच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या मराठा क्रांती मोर्चांच्या माध्यमातून राज्यातील वातावरण ढवळून निघाले होते. दरम्यान, फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवून, २२ नोव्हेंबर रोजी पप्पू उर्फ जितेंद्र शिंदे (२५), संतोष भवाळ (३०) आणि नितीन भैलुमे (२६) या तीन आरोपींना फाशीची शिक्षा झाली होती. या शिक्षेविरोधात महिनाभराच्या आत आरोपींनी वरिष्ठ न्यायालयात दाद मागणे अपेक्षित हाेते. मात्र, तिन्ही आरोपी दोन महिन्यांपर्यंत काहीही हालचाल करू शकले नव्हते. या खटल्यातील आरोपी क्रमांक दोन संतोष भवाळ याने याबाबत जानेवारी महिन्यात उच्च न्यायालयात माफी अर्ज दाखल केला. मात्र, अद्याप तो सुनावणीला आलेला नाही. येत्या १६ ऑगस्ट रोजी औरंगाबाद खंडपिठापुढे तो सुनावणीला येण्याची शक्यता आहे. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून हे तिन्ही आरोपी येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहेत.

 
भय्यू महाराजही नाहीत 
गेल्या वर्षी या प्रकरणातील बळी ठरलेल्या मुलीच्या घरासमोरील शेतात श्रद्धांजली स्मारक उभारण्यात आले आहे. सालबादप्रमाणे यंदाही या ठिकाणी भजन आणि कीर्तनाच्या कार्यक्रमातून श्रद्धाला श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. त्या घटनेच्या धक्क्यातून सावरण्यासाठी तिच्या कुटुंबीयांना आधार देणारे भय्यूजी महाराज यावर्षी नसतील, याबद्दल पीडितेची अाई रेखा सुद्रिक यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना खंत व्यक्त केली. 

बातम्या आणखी आहेत...