आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेच्या मुख्य सभागृहाला गळती; ताडपत्री टाकून पाणी थांबविण्याची धडपड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महापालिकेच्या सार्वभाैम अशा महासभेच्या सभागृहाचे छत एेन पावसाळ्यात चांगलेच गळू लागले अाहे. १९ जुलै राेजी हाेणाऱ्या महासभेच्या पार्श्वभुमीवर अाता छतावर ताडपत्री टाकण्यासाठी बांधकाम विभागाची धावाधाव सुरू झाली अाहे. दरम्यान, पालिकेच्या जुने नाशिकमधील उर्दू शाळेचे वर्गही गळत असून याबाबत 'दिव्य मराठी'ने 'डी. बी. स्टार'मध्ये प्रकाशझाेत टाकला अाहे. 


शहरातील सर्व सरकारी कार्यालयांच्या तुलनेत अादर्श अशी महापालिकेची राजीव गांधी भवनाची इमारत मानली जाते. मात्र, गेल्या काही वर्षात या इमारतीची दुरवस्था झाली अाहे. प्रामुख्याने अस्वच्छतेच्या गर्तेतील या इमारतीची स्वच्छता अायुक्त तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीनंतर खऱ्या अर्थाने हाेवू लागली. दरम्यान, दाेन दिवसांवर महासभा अाली असताना, राजीव गांधी भवनातील मुख्य सभागृहाला तब्बल सहा ठिकाणी गळती लागल्याची बाब लक्षात अाली अाहे. विशेष म्हणजे, महापौरांच्या खुर्चीच्या डाव्या बाजुच्या छतातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती हाेत अाहे. यासह सत्ताधारी व विराेधी बाकांवर माेठ्या प्रमाणात गळती हाेण्याची भीती असल्याने बांधकाम विभाग धास्तावला अाहे. नगरसेवकांचा राेष नकाे म्हणून सभागृहावर ताडपत्रीचे अाच्छादन करून गळती थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू अाहेl. दरम्यान, अशीच परिस्थिती पालिका मुख्यालयाच्या वरच्या मजल्यावरील व विविध विभागात असल्याचे चित्र अाहे. 


महापालिकेच्या सभागृहाला गळती लागली असून सभागृहात पाणी गळत अाहे. यावर उपाय म्हणून सभागृहावर थेट ताडपत्रीचे अाच्छादन करण्यात अाले अाहे.

बातम्या आणखी आहेत...