आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेदी सरकारकडून अाश्वासनपूर्ती न झाल्याने डाव्या पक्षांचा हल्लाबाेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चांदवड - मोदी सरकारला सत्तेतील चार वर्षे पूर्ण होऊनही त्यांनी दिलेली आश्वासने, वचने व घोषणांची पूर्तता न केल्याच्या निषेधार्थ विविध स्थानिक मागण्यांसाठी बुधवारी चांदवड तालुका किसान सभा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भाकप, भारिप बहुजन महासंघ व डाव्या पुरोगामी पक्षांच्या वतीने येथील तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढून जनएकता, जनाधिकार आंदोलन करण्यात आले. 


येथील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात डाव्या पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्र आले. तेथून दुपारी १ वाजेच्या सुमारास विविध मागण्यांच्या घोषणा देत चांदवड-मनमाडरोड, आठवडे बाजार, सोमवार पेठ, शिवाजी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकमार्गे तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. मोदी सरकारने गेल्या चार वर्षांत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्याबद्दल सरकारच्या धोरणाचा निषेध व्यक्त करून स्थानिक मागण्या मांडल्या. या मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या वेळी आंदोलकांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...