आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातबाऱ्यावरील इतर हक्कांतील लिज पेंडन्सीच्या नोंदी होणार रद्द

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- स्थावर मिळकतीच्या गाव नमुना नंबर सातबारा उताऱ्याच्या अधिकार अभिलेखात कुठल्या नोंदी घ्यायच्या याची १९६६ च्या महाराष्ट्र जमीन महसूल कायद्यात स्पष्ट नोंद आहे. त्यात लिज पेंडन्सीचा उल्लेख नाही. त्यामुळे ज्या जमिनीवर यापूर्वीच इतर अधिकार अभिलेखात लिज पेंडन्सीच्या नोंदी घेतलेल्या आहेत, अशा नोंदी ३० दिवसांत रद्द कराव्यात. त्याचा अहवाल आठ दिवसांच्या आत तहसीलदारांमार्फत सादर करावा, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी मंडल अधिकारी आणि तलाठ्यांना दिले आहेत. त्यामुळे आता राज्यात केवळ नाशिकमध्येच लिज पेंडन्सीच्या नावाने सुरू असलेल्या ब्लॅकमेलिंगला चाप बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


चावडीवर प्रसिद्धीचे आदेश 
अधिकार अभिलेखातील इतर अधिकारात असलेल्या लिज पेंडन्सीच्या नोंदी कमी करून त्यांचा अहवाल संबंधित गावाच्या चावडीवर प्रसिद्ध करावयाचा आहे. अधिकारी अभिलेखात लिज पेंडन्सीच्या नोंदी शिल्लक नाहीत. याबाबतचे प्रमाणपत्र तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे पुढील आठ दिवसांत सादर करण्याचेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने आता तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ सुरू झाली आहे. 

बातम्या आणखी आहेत...