आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकरोड रेल्वेस्थानकावरील सरकता जिना प्रवाशांसाठी खुला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - प्रतिदिन १४ ते १६ हजार प्रवाशांचा राबता असलेल्या नाशिकरोड रेल्वेस्थानकावर सरकते जिने (एस्केलेटर) शनिवार (दि. २१) पासून खुले करण्यात आले. सरकत्या जिन्यामुळे महिला, अपंग आणि वृद्धांना फलाट क्रमांक एकवरून फलाट क्रमांक दोन आणि तीनवर जाणे सुलभ होणार आहे. या जिन्यांचे खासदार हेमंत गोडसे आणि रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजेश फोकणे यांच्या हस्ते उद‌्घाटन करण्यात आले.

 

भुसावळ विभागात रेल्वेला सर्वाधिक महसूल देणाऱ्या नाशिकरोड रेल्वेस्थानकामध्ये गत पाच वर्षांपासून एस्केलेटर बसविण्याची मागणी सल्लागार समितीने केली होती. त्यानुसार गतवर्षी यासाठी निधी मंजूर झाला होता. दोन महिन्यांपासून सरकता जिना तयार करण्याचे काम सुरू होते. सर्व चाचण्या झाल्यानंतर प्रवाशांसाठी हा सरकता जिना खुला करण्यात आला. यावेळी खासदार हेमंत गोडसे, रेल्वे सल्लागार समितीचे राजेश फोकणे, नितीन चिडे, नाशिकरोड स्टेशन प्रबंधक आर. के. कुठार, वाणिज्य निरीक्षक मधुकर गोसावी, अभियंता प्रवीण पाटील, वरिष्ठ पाेलिस निरीक्षक जुबेर पठाण, निरीक्षक संजय गांगुर्डे, महेंद्र पगार, कैलास मालुंजकर, अजयकुमार सनोरिया, पी. एच. वाघ, अन्वर शेख, एस. प्रकाश, के. जी. गुप्ता हे उपस्थित होते.

 

दिशादर्शक फलक लावा : रेल्वेस्थानकामध्ये सरकता जिना बसविण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. मात्र, त्यांना सरकता जिना माहिती आहे यासाठी जागोजागी प्रशासनाने दिशादर्शक फलक लावावे, असे खासदार हेमंत गोडसे यांनी स्थानिक
रेल्वे प्रशासनाला सांगितले.


सहा महिन्यांत प्लॅटफॉर्म दोनवरही उभारणार सरकता जिना
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी नाशिकरोड रेल्वेस्थानकामध्ये लिफ्ट सुुरू केली. आता प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर सरकता जिना बसविण्यात आला. सहा महिन्यांच्या दरम्यान फ्लॅटफार्म क्रमांक २ वर ही सरकता जिना बसविण्यात येणार असल्याचे स्टेशन प्रबंधक आर. के. कुठार यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...