आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुलाबजामसाठी तयार केलेल्या उकळत्या पाकात पडून भाजलेल्या चिमुरडीचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गुलाबजामसाठी तयार केलेल्या साखरेच्या उकळत्या पाकात पडून तीन वर्षीय स्वरा ही मुलगी भाजली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. रविवारी(दि. ३०) सकाळी आठच्या सुमारास हिरावाडी येथे हा प्रकार घडला. मुलीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा रात्री मृत्यू झाला. उपचारात हलगर्जीपणा केल्याचा अाराेप करत संतप्त नातेवाईकांनी या रुग्णालयाची तोडफोड केली. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केटरिंग व्यावसायिक पप्पू शिरोडे घरात गुलाबजाम तयार करत हाेते. पाक उकळत हाेता. याचवेळी घरात खेळत असलेली स्वरा पळत अाली व पाकात पडली. यात ती ८६ टक्के भाजली. वडिलांनी तिला तत्काळ आडगावनाका परिसरातील एका खासगी रुग्णालयात नेले. तत्काळ उपचार सुरू करण्यासाठी ५० हजार रुपये भरले. उपचारासाठी रुग्णालयात औषधे उपलब्ध नसल्याने शिरोडे यांनी औषधेही पुरवली. मात्र रुग्णालयात सकाळी ८ वाजता दाखल केलेल्या स्वरावर दुपारी चारला उपचार सुरू केले. त्यानंतर लगेचच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. नातेवाईकांनी डॉक्टरांना याबाबत जाब विचारला असता त्यांनी सकारात्मक उत्तरे दिली नाहीत. यामुळे संतप्त नातेवाईकांनी दवाखान्याची तोडफोड केली. तणाव निर्माण झाल्याने पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत नातेवाइकांची समजूत काढली. पंचवटी पोलिस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरू होते.

बातम्या आणखी आहेत...