आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगापूर धरणात चार वर्षांतील सर्वाधिक कमी पाणीसाठा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात गेल्या चार वर्षांतील सर्वात कमी सरासरी पाणीसाठा आहे. सध्या धरणात ३६ टक्के म्हणजे २०१० दशलक्ष घनफूट इतकेच पाणी उरले आहे. गेल्या वर्षीपेक्षा ताे चार टक्क्यांनी कमी असून समूहातही गतवर्षीपेक्षा सहा टक्के कमी पाणी उपलब्ध अाहे. गेल्या चार वर्षांत २०१६ मध्ये यावेळी धरणात सर्वाधिक ४७ टक्के आणि समूहात ३५ टक्के पाणीसाठा होता. पावसाने ओढ दिल्यास शहरवासीयांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. 


हवामान खात्याने सरासरी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविल्यानंतरही जुलै उजाडला तरी अपेक्षेनुसार पाऊस पडलेला नाही. मान्सूनचे चालू वर्षी उशिराच आगमन झाले. या काळात धो-धो पावसाची अपेक्षा असताना तो हलका आणि मध्यम स्वरूपाचा पडत आहे. इगतपुरी-त्र्यंबकेश्वरमध्येही संततधार सुरू आहे; पण नद्या-नाल्यांना पूर येण्याइतका हा पाऊस नसल्याने धरणांतही पाण्याची आवक कमी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...