आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्षपद पुन्हा एकदा नाशिककडे; संताेष मंडलेचा यांचा एकमेव अर्ज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- उद्याेजक अाणि व्यापाऱ्यांची राज्यातील प्रमुख संघटना मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र चेंबर अाॅफ काॅमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चरचे अध्यक्षपद पुन्हा एकदा नाशिककडे येण्याची शक्यता अाहे. चेंबरची सध्या निवडणूक प्रक्रिया सुरू असून, शुक्रवारी (दि. २७) सायंकाळी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत अध्यक्षपदासाठी विद्यमान अध्यक्ष संताेष मंडलेचा यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झालेला असल्याने मंंडलेचा यांची या पदावर फेरनिवड निश्चित मानली जात अाहे. २ मे राेजी उमेदवारी अर्जांची छाननी हाेणार असून त्यानंतर हे चित्र अधिक स्पष्ट हाेणार अाहे. 


महाराष्ट्र चेंबरचे कार्य राज्यभरात पसरलेले असून उद्याेजक-व्यापारी अाणि शेतकऱ्यांच्या मागण्या, प्रश्न साेडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणे, अभ्यासपूर्ण अहवाल सादर करणे अशा प्रकारचे काम सातत्याने सुरू असते. राज्यभरात चेंबरचे जवळपास ३३०० सभासद असून २२३२ पात्र मतदार अाहेत. त्यापैकी ८६८ मतदार नाशिक जिल्ह्यातील अाहेत. गतवेळी नाशिकच्या रिलायन्स इलेक्ट्राॅनिक्सचे संचालक संताेष मंडलेचा यांची अध्यक्षपदी अविराेध निवड झाली हाेती. यंदादेखील त्यांचाच एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झालेला असल्याने छाननी प्रक्रियेनंतर त्यांच्या निवडीवर शिक्कामाेर्तब हाेऊ शकणार अाहे. 


राज्यभरातून यांचे इतर पदांसाठी अर्ज 
वरिष्ठ उपाध्यक्ष : मनीष काेठारी (नाशिक), ललित गांधी (काेल्हापूर), अमित कामत , सर्फराज खान, दुष्यंत मुलानी, किशाेर अग्रवाल अाणि युसुफ लेनवाला ( मुंबई); उपाध्यक्ष- मुंबई विभाग (दाेन जागा) : अनिल वाघाडकर, करूणाकरन शेट्टी, सर्फराज खान, शुभांगी तिराेडकर अाणि गाैतम ठाकूर; उत्तर महाराष्ट्र ( एक जागा) : संजय साेनवणे, प्रमाेद दीक्षित व अनिलकुमार लाेढा; मराठवाडा (एक जागा) : उमेश दशरथी, किशाेर अग्रवाल व संजय राका; पश्चिम महाराष्ट्र (एक जागा) : ललित गांधी, रवींद्र मानगावे. 


स्थानिक स्तरावर दाेन पॅनलची चर्चा 
नाशिकमध्ये चेंबरच्या विविध समित्या, कार्यकारिणी सदस्य अशी २१ पदे असून त्यासाठी ७३ अर्ज दाखल झाल्याने येथे निवडणुकीकरिता दाेन पॅनलची चाचपणी सुरू असल्याची चर्चा अाहे.

बातम्या आणखी आहेत...