आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मालेगाव ठरले महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक तापमानाचे शहर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड / मालेगाव- मालेगाव, नाशिकसह संपूर्ण जिल्ह्यात शुक्रवारी कडाक्याच्या उन्हामुळे नागरिकांची अक्षरश: हाेरपळ झाली. मालेगावमध्ये या वर्षातील सर्वाधिक ४४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नाेंद झाली. त्यामुळे ते राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात उष्ण शहर ठरले. नाशिकमध्येही एप्रिलच्या अखेरीसच पारा ४०.५ अंशांवर पाेहाचला. 


पंधरवड्यापासून ४२ ते ४३ अंश सेल्सिअस तापमानासह चटका देणाऱ्या उन्हाने शुक्रवारी जिल्हावासीयांना अक्षरक्ष: भट्टीत भाजून काढले. आकाश कोरडे आणि निरभ्र असल्याने उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे सकाळी नऊ वाजेपासूनच उन्हाचा तडाखा सुरू होत असल्याने कमाल तपमानात वाढ होत आहे. शुक्रवारी तर नाशिकमध्ये कमाल पारा ४०.५ अंश सेल्सिअस होता. तर किमान तापमानही १८.४ अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते. रखरखीत उन्हामुळे दुपारी रस्ते निर्मनुष्य हाेते. अत्यंत अावश्यक कामे असलेले नागरिकही गाॅगल, टाेपी, हेल्मेट, स्कार्फ याशिवाय बाहेर पडत नव्हते. 


मालेगावातही महिनाभरापासून तापमान जलदगतीने वाढत असताना पारा किमान ४२ ते ३४ च्या दरम्यान हाेता. या उष्णतेमुळे शहरातील जनजीवन दुपारी ठप्प हाेते. सकाळी साडेसात वाजेपासून तसेच सायंकाळी ६ ते ६.३० नंतरही उन्हाची दाहकता जाणवत हाेती.परंतु, लग्नसराईदेखील जाेमात असल्याने मुख्य रस्त्यांवरील वर्दळ कमी झालेली नाही. वऱ्हाडी मात्र घामाघूम हाेत अाहेत. रस्त्यालगतच्या पाणपाेयांवर गर्दी वाढली अाहे.नागरिक पिशव्यांमध्ये पाण्याच्या बाटल्या अावर्जून बराेबर घेत अाहेत. शीतपेय व शीतलता देणाऱ्या फळांच्या मागणीत वाढ झाली अाहे. त्यामुळे अशा फळविक्रेत्यांच्या गाड्यादेखील रस्त्यालगत अधिक दिसून येत अाहेत.


अाठवडाभर राहणार तीव्रता 
आठवडाभर आकाश नीरभ्र राहणार असल्याने उन्हाची तीव्रता ही कायम रहाणार आहे. शहरात डांबरी आणि सिमंेंटचे रस्ते तापत असल्याने उन्हाची तीव्रता अाणखीनच जास्त जाणवते अाहे. 

बातम्या आणखी आहेत...