आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्रांतीनंतर शहरासह जिल्ह्यात पावसाने पुन्हा पकडला जोर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- यंदा उशीरा दाखल झालेला मान्सून गेले काही दिवस पुन्हा खोळंबला होता. परंतु, नाशिकसह परिसरात पावसाने आता पुन्हा जोर पकडल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांत समाधानाचे वातावरण अाहे. 


पेरण्यांना सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला अाहे. जिल्ह्यात बुधवारी ८.६ मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली. आतापर्यंत सरासरी १८०.३६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. 


बुधवारी नांदगाव, मालेगाव, बागलाण हे तालुके वगळता उर्वरित तालुक्यांमध्ये पाऊस झाला. इगतपुरी, पेठ आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. बाकीच्या तालुक्यांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...