आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारित्र्यावरील संशयावरून पत्नीसह एक वर्षाच्या मुलाचा गळफास देऊन खून; पतीला अटक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदगाव- चारित्र्यावर संशय घेऊन तालुक्यातील कासारी येथील २१ वर्षीय विवाहिता सुवर्णा ज्ञानेश्वर काळे व एक वर्षाचा मुलगा स्वरूप यांची गळफास देऊन हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त हाेत अाहे. याबाबत विवाहितेचे वडील चिंतामण कृष्णा देवरे (रा. मनमाड) यांनी पती ज्ञानेश्वर काशीनाथ काळे, सासू सकूबाई काशीनाथ काळे, नणंद भारती अर्जुन शिंगाडे यांच्याविरोधात नांदगाव पोलिसांत फिर्याद दिली आहे. 


कासारी येथील विवाहिता सुवर्णा ज्ञानेश्वर काळे हिच्या विवाहानंतर सात-आठ महिने संसार सुरळीत चालला होता. मात्र, काही दिवसांनंतर पती ज्ञानेश्वर तिच्या चारित्र्यावर संशय घेत हाेता. पती संशय घेत असल्याचे तिने याबाबत वडील व नातेवाइकांना सांगितले होते. याबाबत तिची समजूत काढत सासरी नांदण्यासाठी पाठवले हाेते. तरीही सुवर्णाला पती, सासू व नणंदेकडून त्रास हाेत हाेता. गुरुवारी तिचे वडील चिंतामण देवरे यांना व्याही काशीनाथ काळे यांनी सुवर्णा व नातू स्वरूप यांनी विषारी औषध घेतल्याचे फोनवरून सांगितले. नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी दोघांचा मृत्यू झाला होता. मुलीच्या मानेवर व्रण दिसत असल्याने तिच्या वडिलांनी खुनाची फिर्याद दाखल केली. शुक्रवारी दुपारी कासारी येथे मायलेकांवर पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रकरणी पती ज्ञानेश्वर काळेला अटक करण्यात आली. गुरुवारी व शुक्रवारी सलग दोन दिवसांत विवाहितेच्या खुनाच्या घटना घडल्याने तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले अाहे. 

बातम्या आणखी आहेत...