आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुनाच्या गुन्ह्यातील साक्षीदार तरुणाचा मध्यरात्री निर्घृण खून; पंचवटीमध्ये पुन्हा भडकले टोळीयुद्ध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- खुनाच्या गुन्ह्यात साक्षीदार असलेल्या तरुणाचा चार-पाच संशयितांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याचा प्रकार मंगळवारी (दि. १०) मध्यरात्री रामवाडी येथे उघडकीस आला. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या भांडणाच्या वादातून अल्पवयीन मित्राने मित्रांच्या मदतीने हा खून केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी रात्रीच एका संशयिताला अटक केली. अल्पवयीनासह एक संशयित फरार आहे. 


वादाने घेतला बळी 
मृत किशोर नागरेवर यापूर्वी भद्रकाली, सरकारवाडा, पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. २०१६ मध्ये त्र्यंबकनाका येथील एका हॉटेलमध्ये गुणाजी जाधव याच्या खून प्रकरणात किशोरवर हल्ला झाला होता. त्यातून ताे बचावला होता. या गुन्ह्यात तो मुख्य साक्षीदार होता. दोन दिवसांपूर्वी गंगापूररोडवरील एका हॉटेलमध्ये मद्य पिण्याचे पैसे देण्यावरून त्याने वाद घातला होता. पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई करत त्याला अटकही केली होती. 


टोळीयुद्धाच्या दिशेने तपास 
फरार संशयितांच्या मागावर पथक पाठवण्यात आले आहे. किरकोळ वादातून हा प्रकार झाल्याचे निष्पन्न हाेत अाहे. तरी टोळीयुद्धाच्या दिशेने तपास सुरू आहे. 
- मधुकर कड, वरिष्ठ निरीक्षक, पंचवटी 


टोळीचे सदस्य सक्रिय 
पंचवटीमध्ये टोळीयुद्धातून खून झाल्याच्या चार-पाच घटना घडल्या आहेत. या गुन्ह्यातील मृत तरुणही टोळ्यांतील वादात गंभीर जखमी झाला होता. पंचवटीमधील दिवे, कोष्टी, परदेशी, निकम, चांगले, मोरे, पगारे या गँगच्या टोळी प्रमुखांसह साथीदार कारागृहात आहेत. मात्र, या 'भाईं'च्या समर्थकांत वर्चस्वासाठी लढाई सुरू असल्याची चर्चा आहे. 

बातम्या आणखी आहेत...