आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'अस्मिता' जिल्हा म्हणून नाशिकची घोषणा, बचतगटाच्या महिला करणार मार्केटिंग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गरिबी, अनुपलब्धता आणि अंधश्रद्धा यामुळे यापुढे राज्यातील कोणत्याही महिलेस किंवा मुलीस स्वच्छता आणि आरोग्य यासाठी अत्यावश्यक सॅनिटरी नॅपकीनपासून वंचित रहावे लागणार नाही, असा विश्वास महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी नाशिकमध्ये व्यक्त केला. 'अस्मिता' या महाराष्ट्र शासनातर्फे उत्पादित सॅनिटरी नॅॅपकीन्सच्या प्रचारासाठी आयोजित अस्मिता मेळाव्यात त्या बोलत होत्या.

 

'अस्मिता' नॅपकीन्समुळे ग्रामीण भागातील बचतगटांतील महिलांना वितरणाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होईल आणि जिल्‍हा परिषदेच्‍या शाळांमधील विद्यार्थीनींना 'अस्मिता कार्ड'च्‍या माध्‍यमातून सहज, स्‍वस्‍त आणि सुरक्षित नॅपकीन्‍स मिळतील हा दुहेरी उद्देश त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

 

अस्मिता मेळाव्यात पंकजा मुंडे म्हणाल्या
- दोन वर्षांपूर्वी मलाही या विषयावर बोलण्यास संकोच वाटायचा.
- पालघरच्या एका दौऱ्यात महिला झाडाची पानं वापरत असल्याचे कळले. आपण याबद्दल बोललो नाही तर मंत्रिपदाचा काय उपयोग असे वाटले. तेव्हा ठरवले, या विषयावर काम करायचे.
- मासिक पाळीच्या काळात ग्रामीण भागातील मुलींची ४० दिवस शाळा बुडते. मासिक पाळीबाबतची अंधश्रद्धा दूर करण्यासाठी अस्मिता रथ पाठवला.
- अस्मिता म्हणजे महिलांचा स्वाभिमान आणि हक्क योजनांची खिरापत नको, सहानुभूती नको, हक्क हवा.
- भाग्यश्री योजनेमुळे मुलींचा दर वाढला.

बातम्या आणखी आहेत...