आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक-दिल्ली विमानसेवा अाजपासून, पहिल्याच दिवशी ११९ प्रवाशांचे 'उडान'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिक-दिल्ली विमानसेवा अाजपासून सुरू हाेत अाहे. जेट एअरवेजकडून १६८ अासनी विमानाद्वारे सुरू हाेत असलेल्या या सेवेला नाशिक अाणि दिल्लीतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, गुरुवारपर्यंत नाशिकहून दिल्लीसाठी ११९ तर दिल्लीहून नाशिकसाठी १२८ तिकिटे बुक झाली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. 


महत्त्वाची बाब म्हणजे हैदराबाद, बंगळुरू, अहमदाबाद, गोवा, भोपाळ, हिंडन अशा सात शहरांना जोडण्यासाठी ट्रू जेट, इंडिगो, स्पाइसजेट व एअर अलायन्स या विमान कंपण्यांना मान्यता मिळाली असून, जुलैअखेरपर्यंत या मार्गावर सेवा सुरू करण्याचे उद्दिष्टे केंद्रीय उड्डाण मंत्रालयाने संबंधीत मार्गावर सेवा देण्याची हमी घेतलेल्या विमान कंपण्यांना दिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...