आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक-इंदूर मार्गावरही धावणार स्लीपर शिवशाही; लांब पल्ल्याच्या मार्गावरील प्रवाशांना मिळणार सुविधा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- खासगी प्रवासी वाहतुकीसोबत स्पर्धा करताना अधिकाधिक प्रवासी वळविण्यासाठी एस.टी. महामंडळातर्फे शिवशाही बसेस सुरू करण्यात आलेल्या आहे. या बसेसला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे नागपूर, कोल्हापूरनंतर आता नाशिक-इंदूर मार्गावर स्लीपर शिवशाही सुरू करण्यात येणार आहे. यामुळे लांब पल्ल्याच्या मार्गावरील प्रवाशांना मदत होणार असून. एस.टी.च्याही उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. 


प्रवाशांच्या सेवेसाठी धावणाऱ्या एस.टी. महामंडळाकडून प्रवासी वाढविण्याबरोबरच उत्पन्न वाढविण्यासाठीही प्रयत्न केले जात आहे. यासाठी एस.टी.कडून विविध उपक्रम व योजना राबविल्या जात आहे. खासगी वाहतूकदारांसोबत स्पर्धा करताना प्रवासी एस.टी.कडे वळावे यासाठी महामंडळाकडून संपूर्ण वातानुकूलित शिवशाही बसेस सुरू करण्यात आलेल्या आहेत. माफक दरात चांगल्या सुविधा मिळत असल्याने बसेसला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने एस.टी.च्या उत्पन्नवाढीलाही चांगलाच हातभार लागला आहे. यामुळे विभागात नाशिक-नागपूर व नाशिक-कोल्हापूर मार्गावर स्लीपर शिवशाही बसेस सुरू करण्यात आल्या. लांब पल्ल्याच्या मार्गावरील या स्लीपर शिवशाहीमुळे प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. 


शिवशाही बसेसची संख्या ७५ वर 
प्रवाशांची मिळणारी पसंती अन् उत्पन्नवाढीला लागणारा हातभार लक्षात घेता नाशिक विभागात शिवशाहीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या शिवशाही व स्लीपर शिवशाही बसेसची विभागातील संख्या ७५ वर पोहोचली आहे. आगामी काही दिवसांत या शिवशाहीच्या संख्येत भर पडणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...