आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निमा'साठी दाेन्ही पॅनलकडून १३१ उमेदवारी अर्ज दाखल; 'एकता'ने खाते उघडले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जिल्ह्यातील उद्याेजकांची संघटना नाशिक इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असाेसिएशन (निमा) ची द्वैवार्षिक निवडणूक सध्या उद्याेग वर्तुळात चर्चेचा विषय ठरत अाहे. या निवडणुकीत सत्ताधारी एकता पॅनल विराेधात उद्याेग विकास पॅनलने दंड थाेपटले अाहेत. गुरुवारी (दि. १२) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत ४१ जागांसाठी दाेन्ही पॅनलकडून तब्बल १३१ उमेदवारी अर्ज दाखल केले गेले अाहेत.

 
दाेन्ही पॅनलने दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांवर नजर टाकली असता माेठ्या उद्याेग गटातून मानद सरचिटणीस पदाकरिता एकता पॅनलच्या किरण पाटील यांचाच एकमेव अर्ज असून दिंडाेरीच्या अतिरिक्त उपाध्यक्षपदासाठी याच पॅनलच्या संजय साेनवणे अाणि अतिरिक्त सेक्रेटरीपदासाठी यतिन पटेल यांचेच उमेदवारी अर्ज असल्याने या तिन्ही जागा एकता पॅनलच्या पारड्यात अविराेध पडल्याचा पॅनलचा दावा असून अधिकृत घाेषणा मात्र निवडणूक कार्यक्रमानुसारच हाेणार असल्याचे 'एकता'ने स्पष्ट केले. 


अायमाच्या निवडणुकीनंतर निमाची निवडणूकही अतिशय चुरशीची हाेणार असल्याचे संकेत मिळत हाेते, अगदी त्याचप्रमाणे दाेन दिवसांत घडामाेडी घडल्या अाणि सत्ताधारी एकता पॅनलच्या विराेधात उद्याेजकांची एक फळीच कार्यरत झाली, यात प्रामुख्याने भाजप व त्यांच्याशी संबंधित भाजप उद्याेग अाघाडी अाणि लघु उद्याेग भारतीचा सहभाग पहायला मिळताे अाहे. दुसरीकडे अाैद्याेगिक संघटनेमध्ये पक्षीय राजकारण नसून येथे उद्याेजक हाच पक्ष असल्याचे एकता पॅनलच्या वरिष्ठ नेत्याने स्पष्ट करीत ही निवडणूक हाेत असल्याने सभासदांनाही निवडीचा त्यांचा हक्क बजावण्याची संधी मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

 

अाता इच्छुकांचेही माघारीकडे लक्ष 
उमेदवारांना माघारीसाठी २२ जुलैपर्यंतची मुदत असून दाेन्ही पॅनलकडून काही उमेदवारांनी दाेन-तीन जागांसाठी अर्ज सादर केलेले अाहेत, यामुळे नक्की काेणाला उमेदवारी दिली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार अाहे. दाेन्ही पॅनलकडून येत्या दाेन दिवसांत प्रचारालाही सुरुवात हाेणार अाहे. 

बातम्या आणखी आहेत...