आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियमबाह्य कामांवरून नाशिक मनपाच्या सभेत जोरदार राडा; नगरसेवकांना दुखापत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - डिसेंबरमध्ये पार पडलेल्या महासभेत विराेध होऊनही भाजप गटनेत्याच्या प्रभागात महिला व बालकल्याण समिती निधीतून बांधकामे करण्यात आल्याचे उघड झाल्याने नाशिक महानगरपालिकेत शिवसेनेसह विराेधी पक्षाच्या नगरसेवकांनी जाेरदार राडा घातला. महापाैरांसमाेर थेट राजदंड पळवापळवीचा प्रयत्न झाल्यानंतर त्याचा बचाव करताना काही नगरसेवकांना दुखापत झाली. राष्ट्रगीत सुरू असतानाही राजदंड पळवापळवी व घाेषणाबाजीचा प्रकार सुरूच होता.


 महिला बालकल्याण , शहर सुधार, अाराेग्य व विधी या समित्यांवरील सदस्य नियुक्तीसाठी नाशिक मनपात सोमवारी महासभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेत इतिवृत्तांना मंजुरी देण्याचा विषय चर्चेला अाल्यानंतर राष्ट्रवादी गटनेते गजानन शेलार यांनी अाक्षेप घेतला. त्यावर महापाैर रंजना भानसी यांनी ‘दुरुस्ती करून घेऊ,’ असे सांगत पुढील विषयाकडे वळण्याचे अादेश नगरसचिवांना दिले. दरम्यान,  महिला बालकल्याण समिती निधीतून गटनेते माेरूस्कर यांच्या प्रभाग क्रमांक २० मध्ये दहा ग्रीन जिम, क्रीडा निधीतून दहा ग्रीन जिम, क्रीडा निधीतून चक्क अंगणवाडीचे काम मंजूर करण्याची नियमबाह्य कामे असल्याकडे लक्ष वेधल्यावर शिवसेनेच्या सत्यभामा गाडेकरांसह माजी महिला बालकल्याण सभापती वत्सला खैरे, पश्चिम प्रभाग सभापती हेमलता पाटील यांनी अावाज उठवल्यानंतर विराेधी पक्ष एकटवले. महापाैरांनी ‘तुमचीही कामे मंजूर करू, पत्र द्या’, असे सांगत अन्य विषयांना सुरुवात केली. त्यामुळे समाधान न झाल्याने संतप्त नगरसेवकांनी ‘नहीं चलेगी, नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी,’ अशा घाेषणा सुरू केल्या.

 

मुंढे बाेले, महापाैर चाले  
महासभेत विराेधकांकडून प्रश्नांच्या फैरी सुरू झाल्यावर अायुक्त मुंढेंंनी महापाैरांना कानमंत्र देणे सुरू केले. महापाैर अायुक्तांच्या सूचनेप्रमाणे विराेधकांना उत्तरे देत असल्याने गैरसमज वाढला. गाेंधळात समिती सदस्यांची नावे जाहीर हाेणे बाकी होती. तेव्हा मुंढेंनी यादीच देऊ टाकण्याचा कानमंत्र महापौरांना दिला. महापौरांनीही मग तोच सूर कायम ठेवल्याने गोंधळ वाढला.

 

माइकची ताेडफाेड; राजदंडावरून जुंपली  
महापाैरांकडून दिलासा मिळत नसल्याचे पाहून व्यासपीठावर गेलेल्या हेमलता पाटील यांनी नगरसचिवांसमाेरील माइकला दणका दिला. त्याचा धक्का लागून राजदंड पडण्याच्या स्थितीत अाला. राजदंड पळवापळवीचा प्रयत्न हाेत असल्याचा समज हाेऊन सत्ताधारी अाणि विराेधकांमध्ये जुंपली. 

बातम्या आणखी आहेत...