आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दगाफटक्याच्या भीतीने भाजपचे सदस्य सहलीला; स्थायी समिती सभापती अाज ठरणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- स्थायी समिती सभापतिपदासाठी अाज शनिवारी सकाळी ११ वाजता निवडणुक हाेत असून भाजपचे स्पष्ट बहुमत असतानाही वजनदार पदाधिकाऱ्यांचे पत्ते कट झाल्यामुळे संभाव्य दगाफटक्याच्या भीतीने नऊही सदस्यांना कडेकाेट बंदाेबस्तात मुंबईकडे सहलीला रवाना करण्यात अाले अाहे. शनिवारी सकाळी हे सदस्य मतदानासाठी नाशिकमध्ये येत असून, भाजपकडून निश्चित झालेल्या हिमगाैरी अाडके-अाहेर यांच्या गळ्यात सभापतिपदाची माळ पडणेही जवळपास निश्चित अाहे. 

 

महापालिकेत भाजपची स्पष्ट बहुमताद्वारे सत्ता असून, स्थायी समितीही याच पक्षाच्या खिशात अाहे. स्थायी समितीवर १६ सदस्य असून विजयासाठी मॅजिक फिगर नऊ इतकी अाहे. इकडे, भाजपकडे नऊ सदस्य असून शिवसेनेचे चार, काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसे प्रत्येकी एक याप्रमाणे तीन सदस्य अाहेत. भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्यामुळे स्थायी समितीसाठी यंदा वजनदार सदस्य शर्यतीत हाेते. त्यात सभागृहनेता दिनकर पाटील, शहराध्यक्षा तथा अामदार बाळासाहेब सानप यांचे कट्टर समर्थक उद्धव निमसे यांच्यात स्पर्धा हाेती. मात्र, अामदार राहुल अाहेर यांच्या भगिनी तथा बाळासाहेब अाहेर यांच्या कन्या हिमगाैरी अाडके-अाहेर यांना पक्षाने चाल दिल्यामुळे पाटील व निमसे संतप्त झाले. सभापती करायचे नव्हे तर स्थायी समितीवर पाठवलेच का, हा अवमान खपवून घेणार नाही असाही इशारा त्यांनी दिल्यामुळे भाजपत अस्वस्थता वाढली हाेती. अशात संघटनमंत्री किशाेर काळकर व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पाटील व निमसे यांना कसेबसे शांत केले मात्र दाेघांनी राजीनामा देण्याची तयारी केल्यामुळे संकट कायम असल्याचे चित्र हाेते. यापार्श्वभुमीवर बहुमत असूनही सदस्यांना एकसंघ ठेवण्यासाठी सहलीला पाठवण्याचा निर्णय घेतला अाहे. 

 

त्यानुसार गुरूवारी सायंकाळी साडेसहा वाजता अाडके-अाहेर यांच्यासह महिला सदस्यांनी सहलीकडे प्रयाण केले. पाठाेपाठ शुक्रवारी पाटील व निमसे यांना गटनेते संभाजी माेरूस्कर यांनी सहलीच्या कॅम्पमध्ये नेत संभाव्य माेट बांधण्याचा प्रयत्न केला. दरम्यान अाडके-अाहेर यांची अविराेध निवड हाेण्याची शक्यता कमी अाहे. शिवसेनेकडून संगीता जाधव यांचा अर्ज असून काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसे अशा तिघांच्या पाठिंब्यावर पक्षविरहित विराेधी अाघाडीवर त्यांची उमेदवारी अाहे. 

 

पालकमंत्र्यांनी घातली नाराज झालेल्यांची समजूत 
भाजपच्या नऊ सदस्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. त्यावेळी नाराजांशी समक्ष व वैयक्तिकरित्याही पालकमंत्र्यांनी चर्चा केल्याचे सांगितले जाते. 

बातम्या आणखी आहेत...