आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीयीकृत बँक कर्मचाऱ्यांचा संप, शंभर काेटींची उलाढाल ठप्प

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राष्ट्रीयीकृत बँक कर्मचारी अाणि अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय देशव्यापी संपामध्ये जिल्ह्यातील सुमारे तीन हजार कर्मचारी सहभागी झाले असून या संपामुळे जिल्ह्यात दोन दिवसांत शंभर कोटींची उलाढाल ठप्प झाल्याची माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. वेतनवाढ करार त्वरित करावा, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या इतर सेवा शर्तीत योग्य सुधारणा घडवून आणाव्यात, पगारवाढीच्या करारात श्रेणी एक ते सात अशा अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात यावा आदी मागण्यांसाठी देशभरातील दहा लाख अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या संपाची हाक दिली आहे. त्यास जिल्ह्यातून उत्तम प्रतिसाद मिळाला.

 

जिल्ह्यात लीड बँक असलेल्या महाराष्ट्र बँकेच्या ९३, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ६०, बँक ऑफ इंडियाच्या ३८, तर युनियन बँक, देना बँकेसह इतर बँकांच्या सुमारे २५० शाखा आहेत. या सर्व शाखांमधून दररोज किमान ५० कोटींची उलाढाल होते, ती दाेन दिवस ठप्प राहणार अाहे. अार्थिक व्यवहार, चेक क्लिअरन्स यासारखे व्यवहार न झाल्याने ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. बँका बंद असल्यामुळे काही ठिकाणी एटीएम सेवाही डळमळीत झाली; मात्र अायएमपीएस, पेटीएम, भीम अॅप, क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग याद्वारे ग्राहकांना व्यवहार करता अाले. या पर्यायी व्यवस्था उपलब्ध असल्याने बरीच गैरसाेय टळली.

 

सहकारी, खासगी बँकांमुळे दिलासा
शहरातील खासगी अाणि सहकारी बँका नियमित सुरू असल्याने ग्राहकांना काहीअंशी दिलासा मिळाला. राष्ट्रीयीकृत बँकांच्या संपामुळे या बँकांत गर्दी हाेती.
बँकसेवा बंद असल्यामुळे अनेक ग्राहकांना परतावे लागले.

 

संघटनेची द्वारसभा अाणि निषेध
सर्व संघटनांनी एकत्रित येत नेहरू उद्यानासमोरील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेसमोर, तसेच स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांनी सीबीएसजवळील शहर मुख्य शाखेसमाेर निदर्शने करत तुटपुंज्या वेतनवाढ कराराचा निषेध केला. एकीकडे सरकारवर कर्जाचा बोजा असताना केंद्रीय कर्मचाऱ्यांना २८ टक्के वेतनवाढ दिली जाते. मात्र बँका सरकारच्या विविध योजनांमध्ये सहयोग देत असताना कर्मचाऱ्यांना केवळ दोन टक्के वेतनवाढीचा प्रस्ताव देण्यात आल्याबाबत संघटना पदाधिकाऱ्यांनी नाराजी दर्शवली.

बातम्या आणखी आहेत...