आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्वानांच्या प्रजननावर नियंत्रण मिळवणे जवळपास अशक्य : अायुक्तांची कबुली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- दरवर्षी लाखाे रुपये खर्च करूनही श्वानांची संख्या अाटाेक्यात का येत नाही. कागदाेपत्री श्वान निर्बीजीकरण दाखवून निधी लाटला जात असल्याच्या तक्रारीवर अायुक्त तुकाराम मुंढे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत श्वानांची प्रजनन क्षमता अधिक असल्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवणे अशक्य असल्याची कबुली दिली. मात्र, त्यानंतरही महापालिका क्षेत्रातील श्वानांच्या निर्बीजीकरणाचा ९२ लाख रुपयांचा ठेक्याला हिरवा कंदील दाखवला गेला. 


महापालिका क्षेत्रातील श्वान निर्बीजीकरणासाठी सुमारे ९२ लाख ८८ हजार रुपयांचा ठेका मंजुरीसाठी अाल्यानंतर सदस्यांनी जाेरदार अाक्षेप घेतले. शिवसेनेचे भागवत अाराेटे यांनी श्वानांची संख्या वाढण्यामागे उघड्यावर हाेणारी मांस विक्री कारणीभूत असल्याचा अाराेप करीत श्वान निर्बीजीकरणापेक्षा मुळावर उपाय याेजणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. मुशीर सय्यद यांनी श्वान निर्बीजीकरणाच्या ठेक्यात निव्वळ ठेकेदाराचे पाेषण हाेत असल्याचा अाराेप करीत निर्बीजीकरण केलेल्या श्वानांनाही पिल्ले झाल्याची मागील काळात घटना घडल्याकडे लक्ष वेधले. सात ते अाठ वर्षांपासून हा ठेका सुरू असताना श्वानांची संख्या तर कमी झालेली नाहीच मात्र, दिवसागणिक वाढत असल्याचा अाराेप केला. शांता हिरे यांनी अापल्या प्रभागात बाजार समितीत सकाळी येणाऱ्यांना श्वानांचा उपद्रव हाेत असल्याचे लक्षात अाणून देताना सफाई कर्मचाऱ्यालाही चावल्याची कैफियत मांडली. पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. राहुल साेनवणे यांना वारंवार कळवल्यानंतरही त्यांच्याकडून लक्ष दिले जात नाही. एका अाजारी गाईचा मृत्यूही उपचाराअभावी झाल्याची खंत व्यक्त केली. संगीता जाधव यांनी शहरातील सर्व कुत्रे पकडून पांडवलेणी परिसरात साेडले जातात. अापल्या प्रभागात कुत्र्यांच्या हल्ल्यात चार व्यक्ती जखमी झाल्याची बाब लक्षात अाणून दिली. दिनकर पाटील यांनीही श्वान निर्बीजीकरणाच्या ठेक्यात गाैडबंगाल असल्याचा अाराेप करीत जबाबदार डाॅ. साेनवणे यांची चाैकशी करण्याची मागणी केली. सभापती हिमगाैरी अाडके-अाहेर यांनी श्वान निर्बीजीकरण ठेक्याचे कामकाज पारदर्शक व्हावे, असे अादेश दिले. अायुक्त मुंढे यांनी श्वानाच्या प्रजननक्षमतेचा वेग अधिक असल्यामुळे संपूर्णत: नियंत्रण अशक्य असल्याचा दावा केला. दरम्यान, निर्बीजीकरण केंद्रात सीसीटीव्ही लावण्यापासून तर अन्य कडक उपाय याेजू असे सांगितले. 


डुक्कर मार माेहीम फसवी; अहवाल मागवला 
शहरातील डुकरे महापालिकेच्या पथकामार्फत पकडून त्यांची खत प्रकल्पावर विल्हेवाट लावण्याची माेहीम फसवी असल्याचा अाराेप करीत सदस्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डाॅ. साेनवणे यांच्यावर अाराेपाची झाेड उठवली. साेनवणे यांनी ११० डुकरे मारल्याचा दावा केल्यानंतर सुषमा पगारे यांनी अापल्या प्रभागात एकही डुक्कर पकडले नसल्याचा दावा केला. दिनकर पाटील यांनीही खाेटी माहिती दिली जात असल्याकडे लक्ष वेधले. मुळात, ठेका दिल्यानंतर प्रशिक्षितांकडून महिनाभरात पाच ते सहा डुकरे पकडली गेली असताना पालिकेचे अप्रशिक्षित व मूळ सफाई कर्मचाऱ्यांनी ११० डुकरे मारलीच कशी? असाही सवाल केला. अापल्या प्रभागात पथक अाल्यानंतर डुकरे नसतात व पथक गेल्यावर डुकरे येतात ही सेटिंग अाहे का अशीही काेपरखळी त्यांनी मारली. दरम्यान, सभापती हिमगाैरी अाडके-अाहेर यांनी याप्रकरणी पुरावे व छायाचित्रानिशी किती डुकरे मारली गेली याचा अहवाल स्थायी समितीवर सादर करण्याचे अादेश दिले. 


गाेठे शहराबाहेर जाणार 
महापालिका क्षेत्रात हरित पट्टा साेडून अन्यत्र असलेल्या गाेठे शहराबाहेर हलवले जाणार असून तशी कायद्यातही तरतूद असल्याचे अायुक्त मुंढे यांनी स्पष्ट केले. त्याबाबत लवकरच महासभेत प्रस्तावही येणार अाहे. मांस विक्री करणाऱ्यांची दुकानेही उघड्यावर असणार नाही. त्यांनी एकतर दुकाने घ्यावी किंवा महापालिकेच्या गाळ्यात लिलावाद्यारे सहभागी हाेऊन जागा मिळवावी अशी मागणी केली. 

बातम्या आणखी आहेत...