आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सासरच्यांसमोर शेततळ्यात उडी घेत विवाहितेची अात्महत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर- घर बांधण्यासाठी माहेरुन ५० हजार रुपये आणावेत, यासाठी सासरच्या मंडळींकडून सुरू असलेल्या जाचास कंटाळून विवाहितेने कुटुंबीयांसमोर शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील हिवरगाव येथे घडली. कविता साईनाथ ढेपले (२४) असे विवाहितेचे नाव असून रविवारी पहाटे ५ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. 


मयत कविता हिचा भाऊ सोमनाथ बाबुराव सैंद्रे (रा. पंचाळे ता. सिन्नर) यांनी याबाबत मुसळगाव एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली अाहे. पती साईनाथ ढेपले, सासरा केरू भनाजी ढेपले, सासू अनुसया ढेपले, दीर भाऊसाहेब ढेपले आणि कृष्णा ढेपले हे तिच्या मृत्यूस जबाबदार असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 


घर बांधण्यासाठी माहेरून ५० हजार रुपये अाणण्यासाठी तिचा वारंवार छळ सुरू होता. या जाचास कंटाळूनच तिने जीवन संपविल्याचे त्यांनी म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सासरच्या पाचही जणांना ताब्यात घेत त्यांच्यावर हुंड्यासाठी महिलेचा छळ करुन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पहाटे ५ वाजेपर्यंत ढेपले यांच्या घरी वाद सुरू होते. त्यातूनच कविता हिने घराजवळील तबाजी गणपत पोमनर यांच्या शेततळ्यात उडी मारून आत्महत्या केली. कुटुंबीयांसमोरच हा प्रकार घडल्याने सारेच चक्रावून गेले. 

बातम्या आणखी आहेत...