आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावठाणात २४ तास पाण्यासाठी ९१ किलोमीटरच्या जलवाहिन्या, ३२२ कोटींच्या प्रकल्प अहवालास मंजुरी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गावठाण भागाला नेहमी भेडसावणारा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी या भागात २४ तास पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. स्काडा तंत्रज्ञानाद्वारे ही व्यवस्था होणार असून, ९१ किलोमीटरच्या वाहिन्यांद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या महत्वपूर्ण निविदेला स्मार्ट सिटी नियोजनाच्या बैठकीत शुक्रवारी (दि. २०) मान्यता देण्यात आली. पाणीपुरवठा, रस्ते आणि पथदीप या विकासकामांसाठी सुमारे ३२२ कोटी रुपयांच्या विस्तृत प्रकल्प अहवालाला बैठकीत मंजुरी देण्यात आली. 


नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या या आठव्या बैठकीमध्ये रेट्रोफिटिंग अर्थात गावठाण भागातील विकास कामांच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. गावठाण भागात २४ तास पाणीपुरवठा, छोटे-मोठे रस्ते व पथदीप या कामांचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. स्मार्ट सिटी कंपनीचे सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी कंपनीचे संचालक महापौर रंजना भानसी, स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, सभागृह नेते दिनकर पाटील, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, आयुक्त तुकाराम मुंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल, शाहू खैरे, गुरुमित बग्गा, तुषार पगार आदी उपस्थित होते. 


बैठकीतील महत्त्वाचे निर्णय 
- पाणीपुरवठ्यासंदर्भातील प्रकल्प अहवालाला मंजुरी 
- बारा बंगला व पंचवटी येथे मोठे जलकुंभ 
- जलशुद्धीकरण केंद्राच्या क्षमतेत वाढ 
- भालेकर हायस्कूलमध्ये मल्टियुटिलिटी सेंटर; तेथे संशोधन व विकास लॅब, स्टार्ट अप हब 
- 'कालिदास'प्रमाणे पंचवटीतील पंडित पलुस्कर सभागृहाचे नूतनीकरण बैठकीत मंजुरी; ध्वनी व्यवस्था, वातानुकूलित यंत्रे व खुर्च्यांची व्यवस्था बदलणार. त्यासाठी २.३३ कोटी रुपयांचा खर्च 
- पालिकेच्या १६ इमारतींवर सोलर पॅनल, वीजनिर्मिती 
- प्रोजेक्ट गोदा अंतर्गत गोदाकाठाचे सुशोभीकरण. गोदाघाट, सुंदरनारायण घाट, टाळकुटेश्वर घाट निर्मिती व सुशोभीकरण 
- होळकर पुलाखाली स्वयंचलित दरवाजा 
- गोदापात्रात लेझर शो 
- २४ तास पुरवठ्यासाठी बारा बंगला व पंचवटी जलशुद्धीकरण प्रकल्पात २ मास्टर बॅलन्स रिझवाॅयर, ५ ईएसआर; उंच इमारतींनाही पाणीपुरवठा 
- भूमिगत गटारींच्या व्यवस्थेत सुधारणा. 


पाणीपुरवठ्यासाठी अशी होणार व्यवस्था 
गावठाणातील रस्त्यांचे रुंदीकरण व काँक्रिटीकरण करताना वारंवार ते फोडले जाऊ नये म्हणून दर ५० मीटरवर नाल्या (डक्ट); त्यातूनच दूरध्वनी, वीज, पाण्याची पाइपलाइन : ९१ किलोमीटरच्या पाइपलाइन 

बातम्या आणखी आहेत...