आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ उत्तरपत्रिका तपासणीत काही त्रुटी आढळल्यास असा करा अर्ज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर विद्यापीठाने विद्यार्थी हित जोपासण्यासाठी उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत देण्याची सुविधा प्रत्येक विद्यार्थ्यांना दिली आहे. अर्थात या सुविधेसाठी फी भरून अर्ज करावा लागतो. पण खरी समस्या पुढेच येते. उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत विद्यार्थ्यांच्या हाती आल्यानंतर त्यात काही चुका आढळू शकतात. कधी गुणच दिले नाहीत. कधी बेरीजच चुकली. कधी एखादा प्रश्न तपासलाच गेला नाही, असे विद्यार्थ्यांना आढळून येऊ शकते. असे झाल्यास करायचे काय ? हा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर येतो. पण एक सोपी प्रक्रिया केल्यास समस्या सुटू शकतात. 


उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत हाती आल्यानंतर विद्यार्थी गुणपडताळणीसाठी किंवा पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यासाठी विद्यार्थी महाविद्यालयात अर्ज करतात. मात्र यासाठी चार पद्धती आहेत. हेही समजून घेतले पाहिजे. 


पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करण्यापूर्वी समजून घ्या या चार महत्त्वाच्या पद्धती 
२. कौंटिंग मिस्टेक - उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत प्राप्त झाल्यानंतर जर उत्तरपत्रिकेमध्ये प्राध्यापकाकडून गुण द्यावयाचे राहिल्यास, एकूण गुणांची बेरीज चुकीची असेल, उत्तरपत्रिकेतील प्रथम पानावर गुण दिल्यास, गुणपडताळणीतील चूक असेल तर गुणपडताळणीतील चूक, कौंटिंग मिस्टेक यासाठी अर्ज करावा. यासाठी शुल्क आकारत नाहीत. 
३. उत्तरपत्रिका तपासणे - नॉट अॅसेस - उत्तरपत्रिकांची छायांकित प्रत प्राप्त झाल्यानंतर जर उत्तरपत्रिकेतील एखादा प्रश्न तपासला नसेल, एमसीक्यू बरोबर असताना चुकीचे दिले असेल तर विद्यार्थ्यांनी नॉट अॅसेसचा अर्ज करावा. पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू नये. या सुविधेसाठीही शुल्क आकारले जात नाही. 
४. पूनर्मूल्यांकन - रिव्हॅल्यूएशन - विद्यार्थ्यांनी ज्या विषयांची छायांकित प्रत घेतली असेल त्याच विषयासाठी पुनर्मूल्यांकन अर्ज सादर करावा. अर्जसोबत गुणपत्रिकेची छायांकित प्रत जोडावी. विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेतील पूनर्मूल्यांकनापूर्वीचे गुण झाकले जातात पूनर्मूल्यांकनामध्ये विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका पूर्ण नव्याने तपासले जातात. पुनर्मूल्यांकनासाठी एका विषयासाठी ५०० रुपये शुल्क आकारण्यात येते. 
१. व्हेरीफिकेशन - यामध्ये उत्तरपत्रिकेतील सर्व गुणांची पडताळणी केली जाते. तसेच उत्तरपत्रिका मूल्यमापन केली नसेल तर उत्तरपत्रिकेचे मूल्यमापन केले जाते निकाल प्रसिद्ध केला जातो. गुणपडताळणीसाठी एका विषयास ५० रुपये शुल्क असते. विद्यार्थी सर्व विषयासाठी गुणपडताळणी अर्ज सादर करू शकतात. परंतु गुणपडताळणीसाठी अर्ज केलेल्या विषयाची छायांकित प्रत विद्यार्थ्यांस घेता येता येणार नाही. 


केवळ विद्यार्थी हितासाठीच 
विद्यार्थ्यांनी छायांकित प्रत घेतल्यानंतर कोणता अर्ज करायचा हे फार महत्त्वाचे आहे. हे लक्षात घेऊनच विद्यार्थ्यांनी अर्ज करावा. ही सुविधा केवळ विद्यार्थी हितासाठीच आहे.
- मलिक रोकडे, प्रभारी संचालक, परीक्षा मंडळ, सोलापूर विद्यापीठ 

बातम्या आणखी आहेत...