आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाइन शाॅपी अन‌् बिअर बारच्या पाट्यांवरील झगमगाट बंद; नट-नट्याही हद्दपार...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - रस्त्याने जाता-येता रात्रीच्या वेळी झगमगतात ते वाइन शाॅप, बिअर शाॅप अाणि बिअर बारच्या पाट्या... काही 'तळीरामां'ची ही झगमगाट बघून 'पिण्या'ची इच्छा हाेते. त्यातच शाॅप वा बारमधील जाहिरातींवरील नट नट्यांची चित्रे पिण्याचे 'प्रलाेभन' वाढवतात. ही बाब लक्षात घेऊन राज्य उत्पादन शुल्क विभागाने काही निर्बंध घातले अाहे. यात यापुढे काेणत्याही वाइन शाॅप, बिअर शाॅप वा बारच्या पाटीवर लायटिंग लावता येणार नाही. त्याचप्रमाणे दारूची जाहिरात काेठे दिसल्यास संबंधित विक्रेत्यावर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार अाहे. दारू विक्री करण्यासाठी वाइन शॉप, बिअर शॉप आणि बिअर बारला राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत परवाना दिला जातो. परवाना मिळाल्यानंतर विक्री वाढण्यासाठी दुकानमालक व चालकांकडून विशेषत: उत्सवाच्या काळात दुकानाच्या फलकावर व इतर ठिकाणी दर्शनी भागात चित्रपट अभिनेत्यांचे फोटो वापरून दुकानाची जाहिरात केली जाते. मद्यशाैकिनांना आकर्षित करणे हा यामागचा हेतू असतो. मात्र, वाइन शॉप, बिअर शॉप आणि बिअर बार विक्रेत्यांना यापुढे दारूच्या ब्रँडची जाहिरातबाजी करण्यास शासनाने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे यापुढे दारूची जाहिरात करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याचप्रमाणे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नाम फलकाच्या बोर्डावर लायटिंगही करण्यास निर्बंध घातले आहेत.

 

कंपनीचे नाव लावण्यास बंदी
नवीन नियमानुसार दुकानाबाहेर लावण्यात येणाऱ्या जाहिरात फलकावर कोणत्याही दारूच्या बाटलीचे, एखाद्या स्त्रीचे आणि दारूच्या कंपनीचे नाव लावता येणार नाही. तसेच केवळ दुकानाचे नाव, लायसन्स नाव आणि लायसन्स नंबर इतकेच दुकानाच्या फलकावर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...