आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपने उमेदवारी नाकारली हे एक न उलगडलेले काेडे : प्रतापदादा सोनवणे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी ही शैक्षणिक क्षेत्रातील भक्कम संघटना आहे. त्यांच्या पाठिंब्याशिवाय निवडणुकीमध्ये विजय प्राप्त करणे सोपे नाही. पण, संघटनेमध्येही राजकीय विषय शिरल्याने गट पडले आणि सत्तेसाठी भांडणे होऊ लागली हे दुुर्दैव आहे. अशा परिस्थितीत भाजपने मला उमेदवारी का नाकारली हे मला अद्यापही समजले नाही. हे एक न उलगडलेले काेडे असल्याने त्यावर अभ्यास सुरू असल्याचे माजी खासदार प्रतापदादा सोनवणे यांनी सांगितले. 


नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी १२ इच्छुकांनी १४ अर्ज दाखल केले. अातापर्यंत या प्रक्रियेत एकूण २५ जणांनी ३४ अर्ज दाखल केले अाहेत. एकेका संघटनेकडून जास्त अर्ज अाल्यामुळे अंतिम उमेदवार ११ जून रोजी माघारीच्या दिवशीच स्पष्ट हाेणार अाहेत. गुरुवारी (दि. ७) अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस असल्याने १२ जणांनी अर्ज दाखल केले. यामध्ये प्रतापदादा नारायण सोनवणे, सुनील पांडुरंग पंडित, महादेव साहेबराव चव्हाण, दिनेश अभिमन्यू देवरे, मुख्तार कासीम शेख, अजितराव किसन दिवटे, सुनील रमेश बच्छाव, कुणाल नरेंद्र दराडे, महेश भिका शिरुडे, विठ्ठल रघुनाथ पानसरे, अशोक शंकर पाटील, प्रकाश हिला सोनवणे यांचा समावेश अाहे. अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना प्रतापदादा सोनवणे यांनी सांगितले की, दोन वेळा आमदार म्हणून निवडून गेल्यावर शिक्षकांच्या समस्या सोडविण्यास मी नेहमीच सर्वाेच्च प्राधान्य दिले आहे. तरी भाजपनेे मला उमेदवारी का नाकारली हे काेडे मला उलगडलेले नाही, त्याच्या कारणांचा मी अभ्यास करीत आहे. परंतु सध्या अपक्ष उमेदवारी असल्याने अापण भाजपला धडा शिकविणार का, या प्रश्नावर थेट उत्तर न देता मी शिक्षकांच्या हितासाठी रिंगणात उतरलेलाे असल्याचे यावेळी सांगितले. अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवारी अंतिम मुदत असल्याने शक्तिप्रदर्शनाऐवजी इच्छुकांचीच संख्या अधिक दिसत होती. ८ जूनला अर्जाची छाननी होणार असून ११ जून ही माघारीची अंतिम मुदत अाहे.


उमेदवारांची संख्या प्रशासनाची डोकेदुखी 
नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघासाठी २५ इच्छुकांनी ३४ अर्ज दाखल केले आहेत. मात्र त्यातील दहा इच्छुकांनी जरी माघार घेतली तरी १५ उमेदवार रिंगणात राहतील. त्यांची मतदान अाणि माेजणीप्रक्रिया राबविणे ही प्रशासनासमोर डोकेदुखी ठरणार आहे. यामुळे मतमोजणीचा कालावधी वाढण्याची शक्यता अधिक आहे. 


पाठक यांच्याएेवजी पाेयम यांची नियुक्ती 
शिक्षक मतदारसंघाच्या नाशिक विभागातील या निवडणुकीसाठी पाेयम यांच्याअाधी एम. डी. पाठक यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, त्यांना मसूरीचे पाचवे प्रशिक्षण बंधनकारक असल्याने राज्य शासनाने आयोगाकडे त्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती रद्द करण्याची विनंती केली होती. आयोगाने ती मान्य करत पोयम यांची नियुक्ती केली. 


मुख्य निवडणूक निरीक्षक एन. के. पोयम यांच्याकडून आढावा, अाजपासून पाहणी दाैरा 
नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारांनी प्रचारासाठी पायाला भिंगरी बांधली असून, विजयासाठी रणनीती आखायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे प्रशासनाने ही प्रक्रिया पारदर्शक आणि कोणाच्याही दबावाखाली होऊ नये यासाठी तयारी सुरू केली आहे. मुख्य निवडणूक निरीक्षक तथा कामगार आयुक्त एन. के. पोयम यांनी गुरुवारी या प्रक्रियेचा आढावा घेतला. अाज (दि. ८)पासून ते नाशिक विभागाचा पाहणी दाैरा करणार असल्याचे विभागीय आयुक्त राजाराम माने आणि उपायुक्त रघुनाथ गावडे यांनी सांगितले. अातापर्यंत ५२ हजार २०१ मतदारांची नोंद झाली असून, पाच जिल्ह्यांतील ९४ केंद्रावर मतदान होणार आहे. विभागीय आयुक्त राजाराम माने हे निवडणूक निर्णय अधिकारी असून सहायक निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील. त्यांनी केलेल्या तयारीची पाहणी करण्यासाठी पोयम हे नाशिक विभागाच्या दौऱ्यावर येत अाहेत. 

बातम्या आणखी आहेत...