आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिस्तुरा फेस्टमध्ये रसिकांच्या उत्साहाला उधाण; नानाविध कलांचा मिलाफ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - रविवारची सुटी अाणि ख्रिसमसची पूर्वसंध्या असा दुग्धर्शकरा याेग साधत नाशिककरांनी गाेदापार्कवर सुरू असलेल्या मिस्तुरा अार्ट फेस्टला कलानंद लुटला. दिवसभर झालेले कलाक्षेत्राशी संबंधित रंगारंग कार्यक्रम अाणि सायंकाळच्या गुलाबी थंडीत गरम दुधाचे घाेट घेत व्हायाेलिनसह राॅक अाणि सुफी गाण्यांची मिळालेली पर्वणी यामुळे सायंकाळ उपस्थितांच्या अाठवणीतील राहिली. साेमवारी (दि. २५) रात्री १० वाजता या फेस्टचा समाराेप हाेणार अाहे.

 

शाैर्य फाऊंडेशनच्या वतीने ‘मिस्तुरा अार्ट फेस्ट’चे अायाेजन करण्यात अाले अाहे. नुपुर यांची नृत्य, झुंबा, सागर गाढवे यांची कॅलिग्राफी, शिल्पा बागडे यांची वारली चित्रकला अशा कार्यशाळांसह काजल पाटील, अमित शिवदे, दिव्या टाेपे, स्मृती माेरे, संस्कृती शिंदे यांचे नृत्य, मारिया इकबाल, काेमल गायकवाड, लुहीशी पगारे यांचे सांगितिक कार्यक्रम, सिद्धांत टाेपीवाला यांचे कविता सादरीकरण अादी कार्यक्रमांनी फेस्टची रंगत वाढविली. तेजस कंसारा, अाकाश जाधव, स्वाती काेलवाने, जयश्री काेलवाने, सागर वाघचाैरे, प्रसार साैंदाणकर, गाेरख टाेपले, वैभव काळे, गुलाब टाकेकर यांनीही अापली कला सादर केली. सायंकाळी अनिल दैठणकर यांच्या व्हायाेलिन वादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.


अाजचे कार्यक्रम
सकाळी १०.३० : बाॅलिवूड कार्यशाळा
दुपारी १२ : वाॅटरकलर पेंटिंग कार्यशाळा
दुपारी 4: कविता, संहिता, संगीत, नृत्य सादरीकरण
सायंकाळी 5 : राहुल म्युझिक अकादमी कार्यक्रम
सायंकाळी 6 : बाॅलिवूड नृत्य कार्यशाळा
सायंकाळी ६.१५ : डान्सट्रूप्स
सायंकाळी 7 : विघ्नहरण पथकाची १०० ढाेलने सलामी
रात्री ८.१५ : फॅशन शाे

बातम्या आणखी आहेत...