आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खाद्यपदार्थांचे अनधिकृत कारखाने रहिवाशांच्या जीवावर; अधिकाऱ्यांचे दुर्लक्षच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मुंबईत गेल्या आठवड्यात एका फरसाणच्या कारखान्यात स्फोट होऊन तब्बल १७ कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच अाता शहरात हिरावाडीसारख्या रहिवासी भागात एका घराच्या तिसऱ्या मजल्यावर अनधिकृतपणे सुरू असलेल्या पाणीपुरीच्या कारखान्यात गॅसगळती होऊन स्फोट झाला. या प्रकारामुळे शहरातील रहिवासी भागात स्फोटक ठरणाऱ्या अनधिकृत कारखाने, बेकरी तसेच स्वीटमार्टचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशाप्रकारच्या घटना वारंवार होत असताना महापालिका, अग्निशमन विभाग मात्र या प्रकाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीवाशी होणाऱ्या खेळावर डी. बी. स्टारने टाकलेला प्रकाशझोत...

 

शहरातील अनेक रहिवासी भागात सर्रासपणे खाद्यपदार्थ तयार करण्याचे कारखाने तसेच स्वीटमार्टसाठी लागणारे विविध पदार्थ तयार करण्याचे कारखाने घरांमध्ये वा इमारतीच्या टेरेसवर सुरू करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे रहिवासी भागात अशाप्रकारचे कारखाने सुरू करण्यास परवानगी नसतानाही कोणत्याही कारवाईची भीती न बाळगता हे कारखाने सर्रास सुरू आहेत. महापालिका व अग्निशमन दलाचे कायदे व नियम धाब्यावर बसवत सुरू असलेल्या कारखान्यांमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या जात नसल्याचे अनेकदा स्पष्ट झाले अाहे. तसेच अशा  धोकेदायक  ठरणाऱ्या  कारखान्यांमुळे  शहरात  आग लागून मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याचा घटना घडल्या आहेत.  शहरातील  हिरावाडीत  एका इमारतीत  गॅसगळती होऊन झालेल्या तीव्र  स्फोटामुळे  स्फोटक ठरू  शकणाऱ्या कारखान्यांनी नागरिकांचा बळी घेतल्यानंतर महापालिका व अग्निशमन दलाला जाग येईल का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

 

थेट प्रश्‍न (अनिल महाजन,  मुख्य अग्निशमन अधिकारी)

Q- शहरात अनधिकृत कारखान्यांत अग्नी सुरक्षेच्या उपाययोजना न करता सुरू आहेत, त्याचे काय?
A- शहरात असे काही कारखाने सुरू असल्यास त्यात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिल्यास त्याविरोधात कारवाई केली जाईल.

 

Q- अग्निशमन दलातर्फे विशेष तपासणी मोहीम राबवली
जाते का?
A- मनुष्यबळ कमी असल्यामुळे अशाप्रकारची तपासणी मोहीम राबविण्यात अडचणी येतात.

 

Q- शहरातील धोकेदायक ठरणाऱ्या कारखान्यांविरोधात काय कारवाई केली जाईल?
A- धोकेदायक ठरणाऱ्या कारखान्यांविरोधात  कायदेशीर कारवाई केली जाईल.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, शहरात यापूर्वी घडल्या घटना, मात्र प्रशासनाला गांभीर्य नाहीच...

 

 

बातम्या आणखी आहेत...