आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आरक्षणाबाबत आयोगाकडे १०० हून अधिक संस्थांची ५३५ निवेदने

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मराठा समाजाचे शैक्षणिक व सामाजिक मागासलेपण विचारात घेऊन आरक्षण द्यावे. आताचा मराठा हा पूर्वीचा कुणबी असून दोन्ही जमाती एकच अाहेत. त्यांच्यात रोटीबेटीचेही व्यवहार होत असल्याचे पुरावे देत पूर्वीचे कुणबी असलेल्या अाताच्या मराठा बांधवांना आरक्षण द्यावे आदी मागण्या मराठा समाजातील विविध शंभराहून अधिक संघटना व   व्यक्तींनी सोमवारी (दि. २८) प्रत्यक्ष हजर रहात राज्यातील एकूण ५३५ निवेदने राज्य मागासवर्ग आयोगाच्या समितीसमोर लेखी स्वरूपात सादर केल्याची माहिती समितीने दिली. तसेच लवकरच प्रातिनिधिक स्वरूपात मराठा समाजाचे प्राबल्य असलेलेल्या गावांमध्ये थेट सर्वेक्षण करून यासंबंधीचा अहवाल सरकारकडे सादर करण्यात येणार असल्याचेही यावेळी समितीने सांगितले. 


पूर्वीचा मराठा समाज आता आर्थिकदृष्ट्या मागासला आहे. मुलांचे शिक्षण करण्याइतपतही परिस्थिती नसल्याने आरक्षण मिळण्यासाठी मराठा समाजातर्फे राज्यभर लाखोच्या संख्येने मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दखल घेत लवकरच आरक्षणाबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे अाश्वासन दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगातर्फे राज्यभार जनसुनावणी घेण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...