आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानपरिषद निवडणूक: सेनेला शह देण्यासाठी नाशिकमधून भाजप ‘राणे अस्त्र’ वापरण्याची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या विराेधामुळे अामदारकी न मिळू शकलेले महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना अाता नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरवण्याच्या भाजपकडून हालचाली सुरू अाहेत. या खेळीने शिवसेनेसाेबतच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनाही शह देण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात अाहे.  


येत्या पाच महिन्यांत नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर उमेदवार पाठवण्यासाठी निवडणूक हाेणार अाहे. या निवडणुकीत जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य मतदान करत असतात. पक्षनिहाय विचार करता सध्या शिवसेनेकडे सर्वाधिक १९०, भाजपकडे १५६, काँग्रेसकडे ५८, राष्ट्रवादीकडे  ९१ व माकप- मनसेसह इतर पक्षांचे ७९  अशी मतदारांची संख्या अाहेत. शिवसेना अाणि भाजपमध्ये ३४ मतांचा फरक असल्याने भाजपही बलाढ्य उमेदवाराच्या शाेधात अाहे. जर राणेंसारखा तगडा उमेदवार दिला तर भाजपसाेबतच इतर पक्षांची मते खेचण्याची त्यांच्यात ताकद अाहे. त्यामुळे विजय मिळवणे सहज शक्य हाेईल, असे अाडाखे भाजपकडून बांधले जात अाहेत. दरम्यान,  बाहेरून अालेल्या उमेदवाराला अामदारकी देण्याची तशी जुनीच परंपरा अाहे. यापूर्वी यशवंतराव चव्हाण, छगन भुजबळ या बाहेरील उमेदवारांनाही याच जिल्ह्याने अामदार म्हणून निवडून दिले हाेते. हीच परंपरा राणेंच्या बाबतीत पुढे चालवण्यात अाली तर त्यात नवल वाटू नये.  


तूर्त विचार नाही : राणे  
या संभाव्य राजकीय घडामाेडींबाबत ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने नारायण राणे यांच्याशी संपर्क साधला असता ‘नाशिकमधून उमेदवारी करण्याबाबत सध्या केवळ चर्चा अाहे. यासंदर्भात मी काेणताही विचार केलेला नाही,’ असे त्यांनी स्पष्ट केले. 

बातम्या आणखी आहेत...