आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

११०० गाळेधारकांना थकबाकी वसुलीच्या नोटिसा, अन्यथा गाळे जप्तीचा महापालिकेकडून इशारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक -  रेडीरेकनरनुसार महापालिकेच्या गाळेधारकांकडून पूर्वलक्षी प्रभावाने भाडेवसुली सुरू झाल्यामुळे त्याविराेधात असहकार पुकारणाऱ्या महापालिकेच्या व्यापारी संकुलातील ११०० गाळेधारकांना नोटिसा बजावत निर्धारित मुदतीत थकबाकी न भरल्यास गाळा जप्तीचीचा इशारा देण्यात अाला अाहे. 

 

अायुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी घरपट्टी-पाणीपट्टीच्या थकीत करांच्या वसुलीसाठी जाेरदार माेहीम उघडली. दरम्यान, शहरातील विविध भागात व्यापारी संकुल, खोका मार्केटमध्ये सुमारे १९०० गाळे शहरातील बेरोजगारांना लिलाव प्रक्रियेद्वारे भाडेतत्त्वावर दिले अाहेत. त्यापैकी तब्बल ११०० गाळेधारकांकडे कोट्यवधींची थकबाकी असून त्याचे कारण म्हणजे, रेडीरेकनरनुसार येथील भाडे अाकारणी संबधितांना अमान्य अाहे. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी या गाळेधारकांकडून रेडीरेकनर दराने भाडेवसुलीचा निर्णय घेतल्यानंतर मनसेच्या काळात महापाैर अशाेक मुर्तडक यांनी संबधित विविध प्रश्नांच्या साेडवणुकीसाठी एक समिती गठित केली होती. मात्र, पुढे त्यात काही हाेऊ शकले नाही. 
दरम्यान, महापालिकेने ११०० भाडेकरूंना नाेटीस बजावत त्यांच्याकडून थकबाकीची मागणी केली अाहे. ही थकबाकी न भरल्यास संबंधित गाळे जप्ती हाेणार असल्यामुळे अाता गाळेधारकांकडून संघर्ष वाढण्याची शक्यता अाहे. याबराेबरच महापालिकेच्या व्यापारी संकुलांमध्ये पोटभाडेकरू ठेवणाऱ्या ७६ गाळेधारकांवर कारवाई केली जाणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...