आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वरातीमागून घाेडे: एेन पावसाळ्यात 110 काेटींच्या ड्रेनेज कामांच्या काढल्या निविदा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरात मलवाहिका अाणि गटारींचे कामे पावसाळ्यापूर्वीच हाेणे अपेक्षित असताना महापालिका प्रशासनाने या कामासाठी ११० काेटींच्या निविदा अाताशी काढल्या अाहेत. प्रशासनाच्या या 'वरातीमागून घाेडे' भूमिकेमुळे यंदाच्या पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रकार गेल्यावर्षीप्रमाणेच वाढणार असल्याचे स्पष्ट झाले अाहे. महापालिकेने काढलेल्या निविदांमध्ये अारसीसी पाइप गटार टाकणे, मलवाहिका लाइन टाकणे अादी कामांचा समावेश अाहे.

 

महापालिकेच्या वतीने गेल्या आठवड्यात नववसाहतींमधील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी नवीन पाइपलाइन टाकण्याच्या कामाला मंजुरी मिळाल्यानंतर आता ड्रेनेजच्या लाइन टाकण्यासाठी निविदाप्रक्रिया राबविण्यात आली आहे. या कामांकरिता महाराष्ट्र शासन अथवा निमशासकीय संस्थेकडे याेग्य वर्गातील पंजीकृत कामाच्या अनुभवी मक्तेदाराकडून इ-टेंडर पद्धतीने निविदा मागविण्यात अाल्या अाहेत.

 

महापालिकेच्या अंदाजपत्रकात तरतूद केल्याप्रमाणे ही कामे होत असून शहराच्या सहा विभागांमध्ये नऊ कामांचा समावेश आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अंदाजपत्रक सादर करताना ज्या भागात ड्रेनेज व पाणीपुरवठ्याच्या कामांना प्राधान्य देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आचारसंहिता संपुष्टात येताच कामांना वेग आला आहे. नववसाहती, दलित व आदिवासी भागात ड्रेनेज लाइन टाकल्या जाणार आहेत. त्यासाठी ११० कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. ही कामे पावसाळ्यापूर्वी झाली असती तर यंदाच्या पावसाळ्यात नाशिककरांना माेठा दिलासा मिळाला असता.

 

या भागात हाेतील कामे
अंबड विभाग : शंकरनगर, गट क्रमांक २२२, गाैळाणा-पाथर्डीराेड, पांडवलेणी, मंगलमूर्तीनगर, पाथर्डी, एक्स्प्रेस इन ते डेमसेमळा, दातीरनगर, चुंचाळे परिसर, ताेरणानगर ते बुद्धविहार, अानंदनगर, वजरे वस्ती, माेंढे मळा, अंबडगाव ते उंटवाडी स्मशानभूमी, नासर्डी नदी ते उंटवाडी स्मशानभूमी
सातपूर : बारदान फाटा ते चिखली नाला, चुंचाळे गाव, अाशीर्वादनगर, दत्तमंदिर ते नासर्डी नदी, अानंदवली गाव, महाराष्ट्र हाैसिंग साेसायटी, जाधव संकुल, गंगापूर गाव, नागरे मळा ते नासर्डी नदी, संत कबीरनगर, सावरकरनगर, श्रीकृष्णनगर, समतानगर, पिंपळगाव बहुला, काेळीवाडा, माळी काॅलनी, कार्बन नाल्यासमाेरील परिसर, खुटवडनगर, नागरे मळा ते नासर्डी, राधाकृष्णनगर, विश्वासनगर, शिवाजी चाैक, पिंपळगाव बहुला.
पश्चिम विभाग : नासर्डी नदीच्या डाव्या तीरावर अायटीअाय पूल ते लव्हाटेनगरपर्यंतचा भाग. सहवासनगर, टिळकवाडी, संभाजी चाैक, राहुलनगर, कस्तुरबानगर, पंडित काॅलनी.
पंचवटी : केतकीनगर, गीतानगर, रामेश्वरनगर, टीबी सॅनिटाेरियम, विनायकनगर, समर्थनगर, वेदनगरी, अाडगाव फाटा ते महालक्ष्मी मंदिर, दत्तमंदिर ते जकातनाका, लक्ष्मी लाॅन्स, इंद्रायणी लाॅन्स, दुर्गानगर, अाडगाव स्मशानभूमी ते समाजकल्याण, वसंतदादानगर, अाैरंगाबादराेड, मानूर फाटा ते जकातनाका, नांदूर गाेदावरी सर्व्हिस स्टेशन ते नीलकंठेश्वर महादेव मंदिर, शरयू पार्क ते कर्मयाेगीनगर, िसद्धार्थनगर, इंद्रप्रस्थनगर, दिंडाेरीनाका, रामकुंड, मानकरनगर, मखमलाबाद, तांदळेवस्ती, गंधारवाडी, मेहरधाम, पिंगळेनगर, पेठराेडजवळील समर्थनगर, लक्ष्मीनगर ते रामनगरपर्यंत मुख्य मलवाहिका, एकतानगर, हनुमान चाैक ते रामकृष्णनगर.

 

या ठिकाणी मलनि:सारण व्यवस्था
मलनि:सारण व्यवस्थेअंतर्गत भगतसिंग चाैक, भगवती चाैक, उत्तमनगर, बडदेनगर, अंबड काेळीवाडा ते शंकरनगर, पाथर्डी, उंटवाडी, शिवपुरी चाैक, दाैलतनगर अादी परिसरात मलवाहिका टाकण्यासाठी ६२ लाख ६ हजारांचे प्राकलन तयार करण्यात अाले अाहे. त्याचप्रमाणे नाशिकराेड विभागातील दामाेदरनगर, बाेराडे मळा, पंचक, सरस्वतीनगर, शेलार मळा, सामनगावराेड, मालाणी भवन, मुक्तिधाम, जिजामातानगर ते अानंद लाॅन्ड्री, गायधनी फ्लाेअर मिल, रुक्मिणीनगर, दसक गाव, वडनेर गेट, हांडाेरे मळा, देशमुख डेकाेरेटर्स, शिखरेवाडी, बेलतगव्हाणराेड अादी ठिकाणी ५१ लाख २४ हजार रुपये किमतीच्या अारसीसी पाईप मलवाहिका टाकण्याचे प्राकलन तयार करण्यात अाले अाहे.
नाशिकराेड : एकलहरा ६० मीटर रस्त्यालगत भाेर मळा, एकलहराराेड, अरिंगळे मळा, एकलहराराेड, अरिंगळे मळा ते सामनगावराेड, त्रिमूर्तीनगर, मथुरा चाैक ते वालदेवी नदी, अण्णा भाऊ साठेनगर ते विटभट्टी देवळाली गाव, वडनेरगेट नाला ते वालदेवी नदीचा पूल, गायकवाड मळा, सिन्नर फाटा, जयभवानी राेड, पाटाेळे मळा, चव्हाण मळा, संजय गांधी झाेपडपट्टी, सिक्युरिटी प्रेस, गांगुर्डे पगारे चाळ, सिद्धार्थनगर, गुलजारवाडी, पिंपळगाव खांब, गणेशनगर, सह्याद्रीनगर, हारक मळा, काेठुळे मळा, हांडाेरे मळा.
नाशिक पूर्व : अण्णा भाऊ साठेनगर, वडाळागाव, हिरवेनगर, भाभानगर, जहांगीर काॅम्प्लेक्स, धवलगिरी साेसायटी, शंकरनगर, तिगरानियाराेड, बजरंगवाडी, अशाेका मार्ग, जे. एम. सी. टी. महाविद्यालयामागे, वडाळागाव, पांडवनगरी, पिंगुळबाग, संत गाडगे महाराज वसाहत, टाकळी गाव, अमृतवर्षा काॅलनी, दीपालीनगर, गीतांजली काॅलनी, चढ्ढा पार्क, माणेकशानगर, राहुलनगर व पंचशीलनगर, विधाते चाळ, कालिका दर्शन साेसायटी, स्काउट-गाइड कार्यालय.

 

बातम्या आणखी आहेत...