आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉटरीद्वारे एकाच शाळेत शिक्षणहक्क अंतर्गत प्रवेशाची संधी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आरटीई प्रवेशासाठी यंदा सर्वाधिक विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज दाखल झाल्याने आता सर्व पालकांचे लक्ष १२ व १३ मार्च रोजी जाहीर होणाऱ्या लॉटरीकडे लागले आहे. पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी जास्तीत जास्त दहा शाळांसाठी अर्ज केले असले तरी एका विद्यार्थ्याची फक्त एकाच शाळेत लॉटरी लागणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे, दिलेल्या मुदतीत लॉटरी लागलेल्या शाळेत संबंधित विद्यार्थ्याचा प्रवेश घेतला नाही तर पुढील सर्व फेऱ्यांसाठी सदर विद्यार्थी पात्र राहणार नाही. त्यामुळे लॉटरी जाहीर झाल्यानंतर पालकांनी संबंधित शाळेत विहित मुदतीत प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहेत.

 

शिक्षणहक्क कायद्यांतर्गत राखीव असलेल्या २५ टक्के जागांवरील प्रवेशासाठी जिल्ह्यातील ६ हजार ५८९ जागांसाठी तब्बल दहा हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज दाखल झाले आहे. आरटीई प्रवेशासाठी यंदा प्रथमच सर्वाधिक अर्ज दाखल झाल्याने सर्वांचे लक्ष आता सोडतीकडे लागले आहे. १२ व १३ मार्च रोजी शिक्षण विभागातर्फे पहिली सोडत जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर १४ ते २४ मार्चपर्यंत शाळेत जाऊन प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याची मुदत आहे.

 

बातम्या आणखी आहेत...