आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भलेही दप्तर विसरा, पण छत्री सोबत आणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक-शाळेत येताना भलेही वही, पेन, पुस्तक सोबत आणायचे विसरला तरी बेहत्तर छत्री मात्र घेऊन या असे फर्मान सोडण्याची वेळ जुन्या नाशिकच्या बडी दर्गा येथील महापालिका शाळेच्या शिक्षकांवर आली आहे. छत गळके असल्याने विद्यार्थ्यांना वर्गात बसताना एका हातात छत्री उघडून धरत अथवा प्लास्टिकचे कापड सांभाळत धडे गिरवणे भाग पड त आहे. दुसरीकडे शाळांमध्ये पहिल्या चाचण्यांची वेळ येऊन ठेपली असताना येथील अवस्था दारुण आहे. 


पावसाळ्याआधीच थोडे थिडके नव्हे तर तब्बल ९ लाख ५० हजार रुपये खर्चून या शाळेची दुरुस्ती करण्यात आली. परंतु, पाऊस सुरु होताच येथील छताची अशी अवस्था झाली असून सरकारी काम केवढे 'दर्जेदार' असते याचा उत्तम नमुनाच यानिमित्ताने समोर आला आहे. महापालिका शाळेची पटसंख्या तसेच दर्जाही वाढविण्यासाठी एकीकडे भलेही उपक्रम सुरु असतील परंतु, अनेक शाळांत सुविधांचीच अशी बोंब आहे. 


गळक्या वर्गांबाबत महापालिका बांधकाम विभागाला वारंवार पत्रव्यवहार केला गेला. परंतु, त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली असल्याने विद्यार्थ्यांना अशा परिस्थितीत शिकावे लागत आहे. नगरसेवकांच्या निधीतून कधीतरी काही कामांवर मलमपट्टीही केली जाते. परंतु, ती किती केविलवाणी असते हे ही काही शाळांना पाहताक्षणी लक्षात येते. गळके छत कोसळून कधी डोक्यावर आदळेल याचा काही नेम नसल्याने आता पालकांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

बातम्या आणखी आहेत...