आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे यंदा 'वटसावित्री' निर्विघ्न; राज्यात सोनसाखळी चोरीच्या घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- भद्रकाली पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेमुळे यंदा महिलांची 'वटसावित्री' निर्विघ्न पार पडली. वटसावित्री पौर्णिमेला महिलावर्ग साेन्याच्या अाभूषणांसह पूजेसाठी बाहेर पडत असल्याची संधी साधत सोनसाखळी चोरांकडून दरवर्षी या महिलांना लक्ष्य केले जात होते. गेल्या वर्षी नाशकात अशा काही घटना घडल्या हाेत्या. यंदा राज्यात अनेक ठिकाणी, विशेषत: पुण्यात साेनसाखळी चाेरीच्या १२ घटना घडल्या. या पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून बुधवारी (दि. २७) ज्या-ज्या ठिकाणी पूजेसाठी महिलावर्ग जमला हाेता, त्या ठिकाणी विशेष पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 


वटपूजेसाठी पारंपरिक वेशभूषा, सोन्याची अाभूषणे घातली जातात. या महिलांच्या अाभूषणांना टार्गेट करणाऱ्या चेनस्नॅचर्सना राेखण्यासाठी पाेलिसांनी यावर्षी विशेष बंदाेबस्त ठेवला हाेता. मोक्याच्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला पोलिस बंदोबस्त, बॅरिकेडिंग यामुळे बुधवारी सोनसाखळी चोरीच्या घटना टाळण्यात यश अाल्याची माहिती वरिष्ठ पाेलिस निरीक्षक भरतकुमार सूर्यवंशी यांनी दिली. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या या सतर्कतेच्या उपाययोजनांबाबत नागरिकांसह महिलांनीही समाधान व्यक्त केले. 

बातम्या आणखी आहेत...