आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकतर्फी वेतनवाढीवर स्वाक्षरी नाही, मान्यताप्राप्त संघटनेची भूमिका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- राज्य परिवहन मंडळ कर्मचाऱ्यांना जुलैच्या पगारातच नवी वेतनवाढ लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकतर्फी वेतनवाढ मान्य नसल्याचे मान्यताप्राप्त संघटनेने म्हटले असून करारावर स्वाक्षरी न करण्याची भूमिका त्यांनी घेतल्याने आगामी काळात पुन्हा एसटी प्रशासन व कामगार संघटनेत संघर्षाची चिन्हे प्रवाशांच्या सेवेसाठी अविरत धावणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन कराराचा प्रश्न गेल्या २६ महिन्यांपासून रखडला होता. 


कर्मचाऱ्यांचा वाढता दबाव लक्षात घेता १ जून रोजी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी वेतनवाढीचा निर्णय जाहीर केला. मात्र, हा निर्णय एकतर्फी असल्याचे सांगून त्याविरोधात एसटी कर्मचाऱ्यांनी ८ व ९ जून रोजी कोणत्याही संघटनेच्या पाठिंब्याविना अघोषित संप पुकारला होता. दरम्यान, रावते व एसटीच्या विविध संघटनांत वेतनवाढ सूत्र ठरविण्याचे अधिकार मान्यताप्राप्त संघटनेला देण्यात आले होते. त्यानुसार या संघटनांनी नवीन वेतनवाढीचे सूत्रही एसटी महामंडळ प्रशासनाकडे दिले होते. परंतु, प्रशासनाने परिवहन मंत्र्याच्या घोषणेप्रमाणेच नवी वेतनवाढ देण्याचा निर्णय घेतला अाहे. त्याबाबतचे परिपत्रकही काढण्यात आले आहे. या विरोधात मान्यताप्राप्त संघटनेकडून विरोध केला जात आहे. 


साेशल मीडियावर सूचक संदेश 
परिवहनमंत्र्यांच्या वेतनवाढीच्या निर्णयाला काही कर्मचाऱ्यांकडून विरोध केला जात आहे. संप केल्यानंतरही 'जैसे थे' परिस्थिती असल्याने एसटी कर्मचाऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. आगामी आषाढी एकादशीनिमित्त जादा बसेस सोडण्याचे नियोजन केले जात आहे. दुसरीकडे नाराज एसटी कर्मचाऱ्यांकडून आषाढी एकादशीदरम्यान संपाच्या वारीवर जाण्याचे संदेश सोशल मीडियावर पसरवले जात आहेत. 

बातम्या आणखी आहेत...