आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रातराणीऐवजी राज्यात धावणार अाता नॉन एसी स्लीपर बसेस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुण्याच्या राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यशाळेत तयार झालेली पहिली नॉन एसी ३० अासने असलेली स्लीपर बस. - Divya Marathi
पुण्याच्या राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यशाळेत तयार झालेली पहिली नॉन एसी ३० अासने असलेली स्लीपर बस.

नाशिक- खासगी वाहतूकदारांसोबत स्पर्धा करताना प्रवासी व उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने शिवशाही बसेस सुरू करण्यात आलेल्या आहेत. अत्याधुनिक स्वरूपाच्या या बसेसचा प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. याच पार्श्वभूमीवर प्रवाशांचा रात्रीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी अत्याधुनिक व आरामदायी अशा स्वरूपाची नॉन एसी स्लीपर बसेस सुरू करण्यात येणार आहे. वर्षभरात अशाप्रकारच्या एक हजार बसेस राज्यात धावणार असून, यामुळे उत्पन्नवाढीस देखील हातभार लागणार आहे. 


प्रवाशांच्या सेवेसाठी धावणाऱ्या राज्य परिवहन मंडळाकडून उत्पन्न व प्रवासी वाढविण्यासाठी विविध योजना व उपक्रम राबविले जात आहे. खासगी प्रवासी वाहतूकदारांपेक्षा प्रवासी एस.टी.कडे वळावे यासाठी अत्याधुनिक सोयीसुविधा व संपूर्ण वातानुकूलित असलेल्या शिवशाही बसेस सुरू करण्यात आल्या. माफक भाडेदर असल्याने या बसेसला चांगला प्रतिसाद मिळू लागल्याने एस.टी.च्या उत्पन्नवाढीला चांगलाच हातभार लागला होता. रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शिवशाहीबरोबरच रातराणी बसेसएेवजी नॉन एसटी स्लीपर बसेस सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार पुण्याच्या मध्यवर्ती कार्यशाळेत पहिली नॉन एसी ३० शयन कोच असलेली स्लीपर बस तयार करण्यात आली आहे. लवकरच सीआयआरटी संस्थेकडून प्रमाणित करून अशाप्रकारच्या एक हजार बसेसची बांधणी केली जाणार आहे. सध्या राज्यात ६०० रातराणी प्रकारच्या बसेस धावत असून त्याच्याजागी या बसेस टप्प्याटप्प्याने सुरू केली जाणार आहे. विशेष म्हणजे या बसची बांधणी एसटीच्या मध्यवर्ती कार्यशाळेत होणार अाहे. एसटीच्याच चालक-वाहकांकडून चालवली जाणार आहे. यामुळे प्रवास सुखकर होणार अाहे. 


रातराणीप्रमाणेच आकारले जाणार भाडे 
प्रवाशांच्या सेवेसाठी साकारण्यात आलेल्या या नॉन एसी स्लीपर बसेस सुरू करण्यात येणार आहे. मात्र, या बसेसचे रातराणीप्रमाणेच भाडेदर आकारले जाणार आहे. प्रवाशांचा खऱ्या अर्थाने अाता प्रवास सुखकर होणार आहे. 


प्रवास अधिक सोयीस्कर होणार 
प्रवाशांच्या सेवेसाठी रातराणी बसेसऐवजी नॉन एसी स्लीपर बसेसमुळे रात्रीचा प्रवास आरामदायी होणार आहेत. यामुळे प्रवासी राज्य परिवहन मंडळाकडे वळण्यास अधिक मदत होईल. 
- दिवाकर रावते, परिवहनमंत्री 

बातम्या आणखी आहेत...