आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समृद्धीसाठीची अधिसूचना येणार पुढील अाठवड्यात; पाचपट माेबदल्यानुसार ताेपर्यंत करता येणार खरेदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- समृद्धी महामार्गासाठी जिल्ह्यात ७५ टक्के जमीन संपादित झाली आहे. उर्वरित २५ टक्क्यांत शेतकऱ्यांचे अंतर्गत, भावा-बहिणीतील वाद, न्यायालयीन वाद सुरू आहेत. ते मिटण्याच्या स्थितीत नसल्याने आता या जमिनी सक्तीच्या भूसंपादन कायद्यानुसार संपादित केल्या जाणार आहे. पहिली अधिसूचना महिनाभरापूर्वीच जाहीर करण्यात आली अाहे. आता अंतिम अधिसूचनाही पुढील आठवडाभरात जाहीर होईल. त्यानंतर अवॉर्डही जाहीर हाेणार असल्याने शेतकऱ्यांना चारपट मोबदला मिळेल. अधिसूचना जाहीर होण्यापूर्वी खरेदी झाल्यास पाचपट दराने लाभ देता येणार असल्याचे समृद्धीचे समन्वयक उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे यांनी सांगितले. 


आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचा महामार्ग म्हणून बिरुद मिरवत नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन वे अर्थात समृद्धी कॉरिडॉरचे काम सुरू झाले आहे. हा मार्ग राज्यातील १० जिल्ह्यांसह सिन्नर व इगतपुरी या तालुक्यांतून जातो. हे अंतर १०० किमी आहे. त्यासाठी जिल्ह्यात साडेबाराशे हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. त्यापैकी ७५० हेक्टर जमीन संपादित झाली आहे. शासकीय जमीन वेगळी असून, ८० टक्के जमीन प्रशासनाच्या ताब्यात आहे. परंतु काम सुरू करण्यासाठी अद्यापही २५ टक्के शेतकऱ्यांच्या जमिनींचे संपादन बाकी आहे. सिन्नरमधील २०० हेक्टर आणि इगतपुरीतील १०० हेक्टर अशी ३०० हेक्टर जमीन संपादनाची प्रतीक्षा आहे. यासाठी प्रशासनाने गत महिन्यात थेट भूसंपादन कायद्याने संपादित करण्याबाबत प्रथम अधिसूचना काढली आहे. आता अंतिम अधिसूचना काढण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यातील सिन्नरची अधिसूचना अाठ ते दहा दिवसांत निघणार आहे. इगतपुरीतील पेसा क्षेत्रात नसलेल्या पाच गावांचीही अधिसूचना यावेळीच निघेल. ही पाच गावे वगळून पेसा क्षेत्रातील गावांची अधिसूचना महिनाभरात निघेल. तोपर्यंत थेट खरेदीने संपादन सुरूच राहील. 


शेतकऱ्यांनी अपासातील वाद मिटवावेत 
आपसातील वाद मिटल्यास शेतकऱ्यांचाच फायदा होईल. त्यांना चारऐवजी पाचपटीने मोबदला मिळेल. अंतिम नोटिफिकेशन जाहीर झाल्यानंतर कुठल्याही स्थितीत सक्तीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होईल. त्याच कायद्यानुसार लागलीच संबंधितांना मोबदला दिला जाईल. त्यामुळे वाद मिटवून अधिक फायदा शेतकऱ्यांनी करून घ्यावा. 
- विठ्ठल सोनवणे, उपजिल्हाधिकारी, नाशिक 

बातम्या आणखी आहेत...