आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: दराडेंच्या अर्जावर राष्ट्रवादीची हरकत; सेनेचा उमेदवारी अर्ज बाद होण्याची भीती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत गटबाजी राेखतांना शिवसेनेची दमछाक हाेत असतांनाच अाता उमेदवार नरेंद्र दराडे यांचा उमेदवारी अर्जच बाद हाेण्याची शक्यता निर्माण झाली अाहे. प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार अॅड. शिवाजी सहाणे यांनी त्यांच्या उमेदवारी अर्जावर अाक्षेप घेतला आहे. दराडे यांनी येवला नगरपालिकेची सुमारे दीड लाखांची थकबाकी भरलेली नाही, तसेच अर्जातील काही रकाने भरलेच नसल्याल्या अाक्षेप सहाणे यांनी घेतला आहे.


जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ वाजेच्या सुमारास अॅड. सहाणे दाखल झाले अाणि त्यांनी तडक निवडणूक निरीक्षक पराग जैन यांच्याकडे दराडे यांच्या अर्जावर हरकत नाेंदविली. त्यानंतर काही वेळातच शिवसेनेच्या गाेटात खळबळ उडाली. शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना हरकतीबाबत ‘माताेश्री’वरुन माहिती कळविण्यात अाल्याचे बाेलले जात आहे. त्यानुसार महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बिडवे, अामदार अनील कदम, महापालिकेचे विराेधीपक्ष नेते अजय बाेरस्ते, माजी महापाैर विनायक पांडे, नगरसेवक सुधाकर बडगुजर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड अादी पदाधिकारी एक-एक करीत जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. यातील काही पदाधिकारी सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत यांच्या संपर्कात हाेते. वकीलांची फाैज लावा, पण उमेदवारी अर्ज बाद हाेऊ देऊ नका असा अादेश खा. राऊत यांनी दिल्याने पदाधिकाऱ्यांची एकच धावपळ झाली. वेगवेगळ्या वकीलांशी सल्लामसलत करीत अर्ज बाद हाेणार नाही यासाठी माेर्चेबांधणी सुरु हाेती. दुसरीकडे निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी येवल्याच्या मुख्यकार्यकारी अधिकारी संगीता नांदुरकर यांना दराडे यांच्या थकबाकीसंदर्भातील कागदपत्रांसह नाशिकमध्ये पाचारण करण्याची सूचना केली. त्यानुसार दुपारी ३ वाजेच्या सुमारास नांदुरकर जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल हाेत अाहे. या संपूर्ण प्रकरणावर चार वाजता सुनावणी हाेणार अाहे. 

 

तर हाेईल दुरंगी लढत...

दराडे यांचा अर्ज बाद झाल्यास राष्ट्रवादीचे अॅड. शिवाजी सहाणे व अपक्ष परवेज काेकणी अशी सरळ लढत हाेऊ शकते. अशा परिस्थिती शिवसेना काय भूमिका घेते हे बघणे अाैत्सूक्याचे ठरणार अाहे.

बातम्या आणखी आहेत...