आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्रपाळीवरून परतताना सिटी सेंटरजवळ दाेन वाहनांनी उडवले; वनकर्मचारी ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सिडकाेतील त्रिमूर्ती चाैकाकडे पायी जाणाऱ्या वन विभागाच्या कर्मचाऱ्याचा सिटी सेंटर माॅल चाैकात साेमवारी (दि. २५) पहाटे पावणेसहा वाजेच्या सुमारास कार अाणि स्काॅर्पिअाेने जबर धडक दिल्याने दुर्दैवी मृत्यू अाेढवला. संभाजी चाैकातील वनविभागाच्या कार्यालयात रात्रपाळी करून घराकडे परतणारे सुभाष नाना गांगुर्डे (५३) गाेविंदनगरकडे भरधाव जाणारी कार व त्रिमूर्ती चाैकाकडून संभाजी चाैकाकडे जाणाऱ्या स्काॅर्पिअाेत अडकून नंतर लांबवर फेकले गेले. डाेक्याला गंभीर मार लागल्याने ते जागीच ठार झाले. दिवसेंदिवस रहदारी वाढत जाणाऱ्या हा रस्ता अाणि चाैक अतिशय धाेकेदायक बनल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले अाहे. 


सिडकाेच्या शिवशक्ती चाैकातील रहिवासी असलेले गांगुर्डे रस्त्याच्या कडेने चालत असताना एबीबी सर्कलकडून भरधाव गाेविंदनगरच्या दिशेने जाणाऱ्या फाेर्ड कारने (एम. एच. १३ इके ९०२५) सिटी सेंटर माॅलच्या चाैकातच जाेरदार धडक दिली.


कष्टातून फुलवले अायुष्य अन‌्... 
मूळचे जाेपूळ (ता. दिंडाेरी) येथील रहिवासी असलेले सुभाष गांगुर्डे गेल्या तीस वर्षांहून अधिक काळापासून शिवशक्ती चाैकात स्थायिक हाेते. त्यांनी अतिशय कष्टातून तीन मुली व एका मुलाचे शिक्षण पूर्ण केले. दाेन मुलींचा विवाह झाला असून धाकट्या मुलीसाठी वर शाेधणे सुरू हाेते. मुलगा अलीकडेच वाडीवऱ्हे येथे कंपनीत कामगार म्हणून नाेकरीस लागला हाेता. दीर्घकाळ संघर्ष केल्यानंतर कुटुंबाची घडी बसत असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने परिसरात शाेककळा पसरली. कधी सायकलीने तर कधी पायी कामावर जाणाऱ्या गांगुर्डे यांच्या अपघाताने कुटुंबीयांसह परिसरातील रहिवाशांसह माेठा धक्का बसला. माेगलनगर येथील स्वामी समर्थ केंद्रातील ज्येष्ठ सेवेकरी म्हणून ते परिचित हाेते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावई, एक मुलगा, चार भाऊ असा परिवार अाहे. 

बातम्या आणखी आहेत...