आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघ्या ५० रुपयांत मिळतात हुबेहूब खोट्या चलनी नोटा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- देशातील काळा पैसा बाहेर यावा यासाठी घेण्यात अालेल्या नोटबंदीच्या निर्णयानंतर चलनी नोटाचे स्वरूपदेखील बदलण्यात आले. मात्र नव्या चलनी नाेटांप्रमाणेच दिसणाऱ्या, त्याच अाकाराच्या अाणि रंगाच्या अगदी हुबेहूब खेळण्यांतील खोट्या नोटा व्यवहारात वापरण्याचा प्रयत्न केला जात अाहे. विशेष म्हणजे १०, २०, ५०, १००, २००, ५०० अाणि २००० रुपये मूल्याच्या १०० नोटा अवघ्या ५० रुपयांमध्ये कारवाईच्या भीतीविना बाजारात विकण्याचा खेळ चिल्ड्रन्स बँकेच्या नावाखाली सुरू असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. 


रात्रीच्या वेळी चलनात अाणण्याचे प्रकार 
अशिक्षित लाेकांची वस्ती असलेल्या किंवा नेहमी ग्राहकांची गर्दी असलेल्या दुकानदारांना टार्गेट करत रात्रीच्या वेळी या खोट्या नोटा व्यवहारात अाणण्याचे प्रकार केले जात आहेत. अंधारात देवघेव करताना अत्यल्प कालावधीत या नोटा ओळखणेही अवघड असल्याने सहजपणे व्यापाऱ्यांकडून त्या स्वीकारल्याही जातात. परत दुसऱ्या ग्राहकांनाही दिल्या जातात.

बातम्या आणखी आहेत...