आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील पाणीस्त्राेतांची तपासणी करण्याचे अादेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- दुषित पाण्यामुळे अतिसाराचा उद्रेक होऊन चार जणांचा मृत्यू झालेल्या सुरगाणा तालुक्यातील राहुडे ग्रामपंचायतीस शुक्रवारी (दि. १३) जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी भेट देऊन माहिती घेतली. संबंधित यंत्रणांनी जबाबदारीने काम करण्याचे व जिल्ह्यातील सर्व पाणीस्त्रोतांच्या तपासणीचे आदेश दिले. 


सुरगाणा तालुक्यातील राहुडे येथील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीत नाल्यातील पाणी गेल्यामुळे पाणी दूषित होऊन ग्रामस्थांना अतिसाराची लागण झाली होती. त्यापाठोपाठ कळवण तालुक्यातील विरशेत येथे पाणी पिण्यास अयोग्य असलेल्या हातपंपाचे पाणी प्यायल्यामुळे साथीचा उद्रेक झाला होता. या घटनेचे पडसाद उमटल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनी तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश दिले होते. जि.प. सर्वसाधारण सभेत जलव्यवस्थापन सभेत तसेच स्थायी सभेत याविषयी वादळी चर्चा झडली होती. घटनेची सर्वकष चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही करण्याचे आदेशही अध्यक्षांनी दिले हाेते. मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. गिते यांनी रजेवरून परतताच पाणी शुद्धीकरणाचा आढावा घेत विहिरीची पाहणी केली. गावात उघडण्यात आलेल्या बाह्यरुग्ण कक्षास भेट देऊन उपचार घेत असलेल्या दोघा रुग्णांची विचारपूसही केली. स्वच्छता, औषधसाठ्याची माहिती घेऊन गावात बांधकाम करण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाकीची पाहणी केली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे, जि.प. सदस्य नितीन पवार, ज्योती जाधव, पं.स. सभापती सुवर्णा गांगोडे, गटविकास अधिकारी केशव गड्डापोळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. लीना ढाके, डॉ. उदय बर्वे, उदय सांगळे उपस्थित होते. 


ठेवण्याच्या जि. प. अध्यक्षांच्या सूचना 
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांनी दिंडोरी तालुक्यातील पांडाणे प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन साथरोग किट उपलब्ध ठेवण्याच्या सूचना दिल्या. पाणीनमुने तपासणी, पाणी शुद्धीकरण याबाबत माहिती घेऊन पावसाळ्यात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना दक्षता घेण्याचे निर्देश दिले. 

बातम्या आणखी आहेत...