आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हक्कांवर गदा आणणाऱ्या 'पवित्र' प्रणालीस संस्थाचालकांचा आक्षेप; आंदोलनाचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शिक्षक व शिक्षणसेवक भरतीसाठी तयार करण्यात आलेल्या 'पवित्र' या संगणकीय प्रणालीद्वारे राज्यातील खासगी शाळांतील भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे. 'पवित्र' प्रणालीविषयी माहिती देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातर्फे संस्था चालकांच्या सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, संस्थाचालकांनी या प्रणालीस विरोध दर्शवला. शिक्षकांची भरती व बदली या हक्कांवरच सरकारकडून घाला घातला जात असल्याचा आरोप करत संस्थाचालकांनी या प्रणालीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयाविरोधात समिती स्थापन करून राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही संस्थाचालकांनी दिला. त्यामुळे शिक्षण विभागाला ही सहविचार सभा आटोपती घ्यावी लागली. संस्था चालकांनी स्वतंत्र बैठक घेत डॉ. सुनील ढिकले यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला. 


राज्य शासनातर्फे खासगी अनुदानित किंवा विनाअनुदानित शाळांमध्ये शिक्षक भरती करण्यासाठी 'पवित्र..व्हिजिबल टू ऑल टिचर्स' ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. शिक्षक भरती या प्रणालीद्वारे करण्यात येणार असल्याने माहिती देण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली रावसाहेब थोरात सभागृहात संस्था चालकांची सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत संस्थाचालकांनी प्रवित्र प्रणालीबाबत अनेक प्रश्न उपस्थित करत शिक्षणाधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडिमार केला. आमच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप करत संस्थाचालकांनी तीव्र विरोध केल्याने अखेर बच्छाव यांना ही सभा आटोपती घ्यावी लागली. महत्वाचे म्हणजे शिक्षणाधिकाऱ्यांनी व्यासपीठ सोडताच संस्थाचालकांनी यावेळी स्वतंत्र बैठक घेत आपल्या मागण्या मांडल्या. संस्थाचालक चलाखी करत असल्याची भावना निर्माण झाल्यामुळे हा एकाकी निर्णय घेण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी करताना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे शिक्षकांची नियुक्ती व बदली या हक्कांवर घाला घातला आहे. संस्थाचालकांकडून सरकारविरोधात आवाज उठविण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन्याचा निर्णय घेण्यात आला. मविप्रचे चिटणीस डाॅ. सुनील ढिकले समितीचे अध्यक्ष राहणार अाहे. यावेळी मविप्रचे संचालक नाना महाले, भाऊसाहेब खातळे, सचिन पिंगळे यांच्यासह संस्थाचालक उपस्थित होते. 


या अाहेत मागण्या 
विनाअनुदानित तत्त्वावरील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा, २३ जून २०१७ पूर्वी नियुक्त कर्मचाऱ्यांची अभियोग्यता, बुद्धिमत्ता चाचणी नकाे, सरल किंवा पवित्र प्रणालीची सक्ती नकाे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा प्रश्न त्वरित सोडवून शिक्षक भरती करावी, सेमी इंग्रजी, मराठी, महाविद्यालयांना वाढीव तुकड्या देण्यात याव्यात. 

बातम्या आणखी आहेत...