आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाेटबंदीने देशात गुंतवणूक अाणि राेजगाराची हत्या केली, पी. चिदंबरम यांचा केंद्रावर आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाेटबंदीनंतर देशात गुंतवणूक करायला काेणी तयार नाही. एकट्या तामिळनाडूमध्ये ५० हजार लघु व सूक्ष्म उद्याेग बंद पडले आहेत. ज्यामुळे पाच लाख लाेकांना राेजगार गमवावा लागला. ११ लाख काेटींची गुंतवणूक वाया गेली, ही स्थिती त्या राज्याचे अर्थमंत्री तेथील विधानसभेत देतात. त्रिचूर येथे साडेचार हजार सूक्ष्म उद्याेग बंद पडले अाणि किमान दहा हजार लाेक बेराेजगार झाले. हीच स्थिती देशभरात असून नाेटबंदीने या देशात गुंतवणुकीची व रोजगाराची हत्या केल्याचा आरोप माजी केंद्रीय अर्थमंत्री अाणि काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी माेदी सरकारवर केला.   


महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी चाेपडा लाॅन्स येथे अायाेजित ‘कमी गुंतवणूक, राेजगार नाही’ या विषयावर अायाेजित चर्चासत्रात ते बाेलत हाेते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण, खासदार कुमार केतकर अाणि माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे व्यासपीठावर हाेते. यूपीएच्या काळात व्हॅटसारखी करप्रणाली अाणली गेली. ती सुलभरीत्या राबवली गेली. कुठलाही माेर्चा देशात निघाला नाही. जीएसटी हे अामचे पुढचे पाऊल हाेते. मनमाेहनसिंग अाणि अापण स्वत: यासाठी खूप प्रयत्न केले. मात्र, भाजपने सातत्याने अाठ वर्षे जीएसटीला विराेध केला. अगदी २०१४ मध्येही त्यांचा विराेध कायम हाेता. मात्र, यानंतर जीएसटी लागू करून या सरकारने त्याचे क्रेडिट लाटण्याचा प्रयत्न केल्याचे सांगत, या सरकारने ज्याप्रकारे जीएसटी अाणला त्यामुळे देशभर माेर्चे, अांदाेलने पाहायला मिळाली. देशभरात व्यवसाय करायचा असेल तर व्यावसायिकाला वर्षाला एक हजार रिटर्न्स भरावे लागत अाहेत. वर्षभरानंतरही जीएसटीअार-१ च सुरू अाहे. त्यामुळे गुंतवणूक घटली अाणि राेजगारनिर्मिती थांबली. जगभरात जीएसटी म्हणजे एक कराचा एकच दर असे सूत्र असताना या सरकारने मात्र अाठ दर ठेवले असून ते सामान्यांसाठी जाचक असल्याकडे चिदंबरम यांनी लक्ष वेधले.

बातम्या आणखी आहेत...