आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काॅपी पुरविण्यासाठी पालकच करतात शिक्षकांना दमदाटी, अहवालातून समोर आली माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - राेहिले अाश्रमशाळेत उघडकीस अालेल्या काॅपी प्रकरणाची अादिवासी सेवा समितीच्या चाैकशी समितीने केंद्राला भेट देऊन चाैकशी केली. या चाैकशीत स्थानिक शाळेतील कर्मचाऱ्यांचा या प्रकारात कुठलाही सहभाग नसल्याचे निष्पन्न झाल्याचे संस्थेने कळविले अाहे. परीक्षा केंद्रावर सुपरव्हिजन करणाऱ्या शिक्षकांना दमबाजी करीत इतर संस्थेतील विद्यार्थ्यांचे पालक कॉपी पुरवण्यासाठी एकच गर्दी करीत असल्याचे चाैकशीअंती स्पष्ट झाले अाहे. यासंदर्भातील सविस्तर अहवाल माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाला समितीने पाठविला अाहे.

 

रोहिले येथील आदिवासी सेवा समिती संचालित मातोश्री रेणुकाबाई हिरे प्राथमिक शाळेत काॅपीचा प्रकार सुरू असल्याचे वृत्त दिव्य मराठीने प्रसिद्ध केले हाेते. शिक्षक अामदारांच्याच शाळेत काॅपीचा प्रकार सुरू असल्याने या वृत्ताला अधिक महत्व प्राप्त झाले. यासंदर्भात अादिवासी सेवा समितीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले अाहे की, परीक्षा केंद्र जरी या संस्थेचे असले तरी काॅपी प्रकरणात सहभागी शिक्षक वा तत्सम व्यक्तींचा संस्थेशी संबंध नाही. या केंद्रावर पिंप्री त्र्यंबक, वेळुंजे, रोहिले, देवरगाव, पिंपळगाव गरुडेश्वर येथील दहावीचे परीक्षार्थी विद्यार्थी परीक्षा देत अाहेत. या केंद्रावर पिंपळगाव (ग) च्या शासकीय आश्रमशाळेचे मुख्याध्यापक एम. ई. विसावे केंद्र संचालक म्हणून कामकाज पाहत आहेत.

 

देवरगाव येथील शासकीय अाश्रमशाळेचे मुख्याध्यापक ए. एन. शिंदे उपकेंद्र संचालक म्हणून कामकाज पाहत आहेत. परीक्षा केंद्रावर सुपरव्हिजन करणाऱ्या शिक्षकांना न जुमानता इतर संस्थेच्या शाळेचे पालक काॅपी पुरविण्यासाठी एकच गर्दी करतात. एका विद्यार्थ्यांला चार-चार व्यक्ती काॅपी पुरविण्यासाठी वर्गात येत असल्याचे चाैकशीत समाेर अाले अाहे.

 

अहवाल बाेर्डाकडे सादर
या प्रकाराचा शिक्षक उपसंचालक तथा एसएससी बोर्डाला सविस्तर अहवाल पाठविण्यात आला अाहे. हा प्रकार इतर परीक्षार्थी व पालक वर्ग यांनीच केलेला आहे. परीक्षा कालावधीत शाळेची इमारत ही परीक्षा केंद्र संचालक व उपकेंद्र संचालक यांच्या कक्षेत येते. परीक्षा सुरळीत व शांततेत पार पडण्याची जबाबदारी त्यांचीच असते. वास्तविक पाहता इंग्रजी, गणिताच्या पेपराला पोलिस कुमक अधिक हवी असते. पण एका पोलिसाला हजारो पालक काय जुमानणार, असा सवालही समितीने अापल्या अहवालात केला अाहे.

बातम्या आणखी आहेत...