आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरात डेंग्यूच्या अळ्या अाढळल्यास जबर दंड; पालिकेचा नवा पवित्रा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शहरात गतवर्षाच्या तुलनेत डेंग्यूचा प्रभाव वाढत असल्याचे बघून अाता महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने ज्या घरात डेंग्यूच्या अळ्या सापडतील त्यांनाच जबर दंड आकारणीचा पवित्रा घेतला अाहे. त्यासाठी नवी मुंबई व मुंबई महापालिकेकडून दंड अाकारणीबाबतच्या प्रक्रियेचे मार्गदर्शन मागवण्यात अाले असून मुंबई महापालिकेकडून अावश्यक माहिती वैद्यकीय विभागाला पाठवली गेली अाहे. नागरिकांवरच दंडाचा दबाव निर्माण करून डेंग्यू निर्मूलनासाठी धडपड सुरू झाली अाहे. 


मुंबईपाठाेपाठ डेंग्यूचा तडाखा नाशिक महापालिका क्षेत्रात असल्याचे गेल्या काही वर्षांत प्रकर्षाने दिसून अाले. डेंग्यूशी संबंधित एड्स या डासाची उत्पत्ती स्वच्छ पाण्यात हाेत असून, असे पाणी घरोघरी साचलेल्या विविध प्रकारच्या टँक्समध्येच असल्याचेही उघड झाले हाेते. काही ठिकाणी राेपांच्या कुंड्या, टायर, बांधकाम प्रकल्प, पंक्चरच्या दुकानातही डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या डासांच्या अळ्या अाढळल्या हाेत्या. सामान्यत: पेस्ट कंट्राेल हे घराबाहेरील जागेत हाेत असून धूर व अाैषध फवारणीही घराबाहेरच हाेते. मात्र, घरातील पाण्यावर काेणत्याही पद्धतीची फवारणी करणे धाेकेदायक असल्यामुळे डेंग्यूवर नियंत्रणासाठी सातत्याने साठवणूक केलेल्या पाण्याचा बदल हाच एकमेव उपाय असल्याचे वैद्यकीय विभागाचे म्हणणे अाहे. 


मध्यंतरी, अायुक्त तुकाराम मुंढे यांनी डेंग्यू व मलेरिया या दाेन अाजारांबाबत अाढावा घेतल्यानंतर शहरात मलेरियाचे रुग्ण अल्प असल्याचे लक्षात अाले. मात्र, डेंग्यूची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे त्यांनी अाता थेट नागरिकांवरच कारवाईसाठी सूचना केल्या अाहेत. प्रबाेधन करूनही पाणी बदल हाेत नसल्यामुळे यापुढे डेंग्यूच्या अळ्या ज्या घरात सापडतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार अाहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई व नवी मुंबई महापालिकेकडून कशा पद्धतीने दंड अाकारणी हाेते याबाबत मार्गदर्शन मागवण्यात अाले हाेते. त्यातील मुंबई महापालिकेचे मार्गदर्शन प्राप्त झाले असून, नवी मुंबई महापालिकेचे मार्गदर्शन अाल्यानंतर त्यातून कठाेर असा प्रस्ताव नाशिक महापालिका क्षेत्रासाठी लागू केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 


सहा दिवसांत डेंग्यूचे १६ रुग्ण 
डेंग्यूचा धुमाकूळ सुरूच असून, अाठवडाभरात १६ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे उघड झाले अाहे तर ४९ संशयित रुग्ण अाढळले अाहेत. जून महिन्यात डेंग्यूने गेल्या पाच महिन्यांतील उच्चांक गाठत ६८ बाधित तर १४३ संशयित रुग्ण अाढळले हाेते. जानेवारी ते जून यादरम्यान ३९३ संशयित तर ११७ डेंग्यूचे बाधित रुग्ण अाढळले अाहेत. 

बातम्या आणखी आहेत...