आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिंद्रातर्फे काश्यपी, गंगापूर धरणाजवळ ९ हजार राेपांची लागवड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महिंद्रा अॅण्ड महिंद्रा नाशिक प्लान्टच्या हरियाली या उपक्रमांतर्गत नऊ हजार वृक्षांची लागवड करण्यात अाली. जलसंपदा विभागाच्या सहकार्याने काश्यपी व गंगापूर धरण परिसरात ही लागवड करण्यात अाली. 


या उपक्रमात महिंद्रा कंपनीतील ६०० हून अधिक कर्मचारी व अधिकाऱ्यांसह जलसंपदा विभागाचे अधिकारी अाणि कर्मचारी सहभागी झाले हाेते. महिंद्राच्या नाशिक व इगतपुरी विभागाचे प्रमुख हिरामण अाहेर यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षाराेेपण व संवर्धनाचा कार्यक्रम पार पडला. लागवड करण्यात अालेली झाडे पाच वर्षे सांभाळण्याची जबाबदारीही त्यांनी कर्मचारी व अधिकाऱ्यांवर दिली. महिंद्राच्या नाशिक प्लान्टच्या वतीने अात्तापर्यंत तीन लाखांहून अधिक झाडे लावण्यात अाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 


नाशिक जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता तथा लाभक्षेत्र प्राधिकरणाचे प्रशासक राजेश माेरे यांनी लागवड केलेल्या सर्व वृक्षांची पाहणी केली. वृक्षांच्या संरक्षणासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करण्याची हमी दिली. यावेळी उपअभियंता विलास तांदळे, शाखा अभियंता एस. के. मिसाळ, शाखा अभियंता दिघे, महिंद्राचे कमलाकर घाेंगडे, कर्नल बॅनर्जी, सतीश बिल्डीकर, अाशुताेष अग्निहाेत्री, इकबाल नायर उपस्थित हाेते. 

बातम्या आणखी आहेत...