आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिडकोत वाहनांच्या काचा फोडणाऱ्या गुंडाची धिंड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको - उपेंद्रनगर येथील साईग्राम भागात बुधवारी रात्री मद्यपी गुंडांनी हैदोस घालत वाहनांच्या काचा फोडल्या होत्या. काहींच्या घरासमोरील दुचाकी व चारचाकी वाहनांच्या काचा फोडत नागरिक व महिलांना शिवीगाळ केली. शिवाय पोलिसात जाल तर बघून घेऊ अशा धमक्याही दिल्या होत्या. यामुळे नागरिक प्रचंड घाबरले होते. या गुंडांची परिसरात पुन्हा दहशत सुरू झाल्याने अंबड पोलिसांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेऊन परिसरातून धिंड काढली.

 

कुख्यात टिप्पर गँगच्या नावाचा वापर करत संशयित राजा मोहन पारधी हा युवक गुंडगिरी करत होता. बुधवारी त्याने मद्यपान करत घुमाकूळ घातला. नागरिकांनी पोलिसांना कळविताच त्यांनी पारधीला ताब्यात घेतले. गुरुवारी याच पारधीची उपेंद्रनगर, साईग्राम परिसरातून धिंड काढली.

बातम्या आणखी आहेत...