आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युद्धभूमीवरील चित्तथरारक लष्करी सराव; नाशिककरांच्या डाेळ्यांचे पारणे फेडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- कधी लाइट फिल्ड गनचा दणका... कधी भारतीय तर कधी रशियन बनावटीच्या तोफांचा भडिमार... कधी साॅल्टम माॅर्टरचा मारा... कधी हॅवित्झर तर कधी बोफोर्स ताेफेचा धमाका... तर कधी राॅकेट लाँचरमधून निघणारे अागीचे लाेेळ... एकापाठाेपाठ हवेत झेपावत ४ ते ५ किलाेमीटर लांब डाेंगरावरील लक्ष्याचा वेध घेणारे ताेफगाेळे... अन् त्यापाठाेपाठ ‘चेतक’, ‘चित्ता’, ध्रुव अाणि लॅन्सर हेलिकाॅप्टर्सच्या चित्तथरारक कसरतींनी फेडलेले प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे.  भारतीय लष्कर दिनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी ‘फायर पाॅवर’ हा लष्कराचा वार्षिक सराव तसेच शक्तिस्थळांचे दर्शन घडवणारा नेत्रदीपक साेहळा नाशिकजवळील शिंगवे बहुलानजीकच्या लष्करी क्षेत्रात पार पडला.  

 

हेलिकाॅप्टर्सच्या कसरती व पॅराट्रुपर्स
सैन्यदलाकडे असलेल्या चेतक, चित्ता, ध्रुव या हेलिकाॅप्टर्सनी डाेंगरांच्या अगदी जवळून जाणे, डाेंगराच्या तळापाशी शत्रूच्या नजरेतून लपत छपत जाणे, मागे नेणे अशा अनेक कसरती करून दाखवत सगळ्यांची दाद मिळवली. अांतरराष्ट्रीय स्तरावर व्हिएतनाम युद्धात प्रथमच करण्यात अालेल्या या तंत्राला भारतीय लष्कराने कसे अात्मसात केले अाहे, तेच त्यातून अधाेरेखित झाले.

 

या युद्धसामग्रींचा थरार
- ३५ सेकंदात मारा करणारे लाइट फिल्ड गन
- ६० सेकंदात दाेन फैरी झाडणारी भारतीय ताेफ
- १४ सेकंदात ३ राउंड मारा करू शकणारी हॅवित्झर ताेफ
- ३६० डिग्री स्वयंचलितपणे फिरत ६० अंशांच्या काेनातून मारा करू शकणारी बाेफाेर्स ताेफ
- २० सेकंदात ४० राॅकेट ४० किलाेमीटरपर्यंत लक्ष्यवेध करू शकणारे राॅकेट लाँचर

बातम्या आणखी आहेत...