आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

९५ काेटी खर्चून बांधलेल्या बिटकाे रुग्णालयाचे अाता खासगीकरण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिकराेड येथे ९५ काेटी रुपये खर्चून बांधलेले बिटकाे रुग्णालयाच्या कामात झालेली दिरंगाई व त्यामुळे पालिकेच्या तिजाेरीवर अतिरिक्त बाेजा पडल्याच्या अाराेपावर स्पष्टीकरण देताना अायुक्त तुकाराम मुंढे यांनी अत्याधुनिक, उच्च दर्जाच्या सुविधा व कुशल वैद्यकीय अधिकारी किंबहुना तत्सम मनुष्यबळ पुरवण्यासाठी खासगीकरणाचा विचार करावा लागेल असेही संकेत दिले. त्यामुळे कालीदास कलामंदिरापाठाेपाठ अाराेग्यसेवाही खासगीकरणातून दिली जाते काय असा सवाल निर्माण झाला अाहे. 


अाचारसंहिता संपल्यानंतर झालेल्या पहिल्याच स्थायी समिती बैठकीत सभापती हिमगौरी आडके-आहेर यांच्या अध्यक्षतेखाली नानाविध विषयांवर चर्चा झाली. बिटको रुग्णालयाच्या नवीन इमारतीत अग्निप्रतिबंधक व आगशोधक यंत्रणा बसविण्याच्या १७.७६ लाखांच्या वाढीव खर्चाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यास दिनकर पाटील यांनी अाक्षेप घेतला. मुळात, निर्धारित मुदत संपल्यानंतरही रुग्णालयाचे कामकाज पूर्ण झालेले नाही. त्यावर वाढीव खर्चही झाल्याचा संशय अाहे. अग्निशमन विभागात गैरप्रकार सुरू असून त्यास अग्निशामक दलप्रमुख अनिल महाजन हेच जबाबदार असल्याचा आरोपही पाटील यांनी केला. शहरातील अनेक रुग्णालयांना अग्निशामकची ना हरकत विशिष्ट कंपन्याकडूनच फायर अाॅडिट करून घेतल्यावर मिळते याकडे लक्ष वेधले. दरम्यान, मुंढे यांनी पाटील यांचे अाराेप खाेडून अशा पद्धतीच्या विशिष्ट संस्था तपासणीत अाढळल्या नसल्याचा दावा केला. त्याबराेबरच इमारतीत केवळ रुग्णालय उभारावे की पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमही चालवावा यात कालपव्यय झाल्याचे स्पष्ट केले. अत्याधुनिक सुविधांयुक्त रुग्णालय उभारण्यासाठी इमारतीत काही फेरबदल करावे लागले अाणि त्यामुळे खर्च वाढल्याचाही दावा केला. दरम्यान, पालिकेतील अपुरे मनुष्यबळ, भरतीतील अडचण व दुसरीकडे इतके माेठे रुग्णालय चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी लागणारा खर्च, चांगल्या सुविधा आणि मनुष्यबळाचा विचार करता रुग्णालय पालिकेमार्फत चालवावे की खासगीकरणातून याबाबत धोरण ठरवावे लागेल, असेही मुंढे यांनी स्पष्ट केले.


वाहनचालकांचाही खासगीकरणाद्वारेच ठेका 
अपुऱ्या मनुष्यबळाच्या नावाखाली खासगीकरणाद्वारे ठेके देण्याची परंपरा कायम असून, महापालिकेत वाहनचालकांचे आउटसोर्सिंग करण्याच्या प्रस्तावास स्थायी समिती सभेत मंजुरी दिली. या प्रस्तावाला शिवसेनेचे प्रवीण तिदमे यांनी हरकत घेत खासगीकरणाएेवजी मानधनावर वाहनचालक भरती केल्यास माेठी बचत हाेईल. शिवाय स्थानिक भूमिपुत्रांना न्याय दिला जाईल अशी भूमिका मांडली. मात्र, मानधनावर भरती केल्यास भविष्यात मागच्या दाराने मानधनावरील वाहनचालकांना महापालिका सेवेत घेण्यासाठी प्रयत्न हाेईल व त्यात नुकसान अधिक असेल असे सांगत मुंढे यांनी हरकत फेटाळली. 

बातम्या आणखी आहेत...